breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘युपीएससी’ची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी घेतले पालिकेच्या कारभाराचे ‘धडे’

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

भारतात नागरीकरणाचा वेग वाढत असल्याने आगामी काळात त्याबाबतच्या नियोजनाला प्राधान्य द्यावे लागेल व प्रशासकीय अधिका-यांनी तसा दृष्टीकोन ठेवावा असे मत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या युपीएससी परीक्षेचे ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परिक्षा केंद्र पुणे येथील विद्यार्थ्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली

त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परिक्षा केंद्र पुणे येथील युपीएससीचे विद्यार्थी सचिन लांडे, संग्राम शिंदे, युगल पाटील, सुदर्शन सोनवणे, शुभम जाधव, राकेश अकोलकर, महेश गिते, मंदार पत्की, निलेश प-हाते, उमेश रामटेके, संदिप देवकाते, सागर जत्राते, प्रतिक पतरांगे, ऐश्वर्या हिरे, सुप्रिया मोहिते, गौरी पुजारी, वर्षा साबळे, विद्या मापारी, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात महापालिकेच्या आजपर्यंत झालेल्या विकासाची माहिती दिली. रस्ते, पाणीपुरवठा, अतिक्रमण, सार्वजनिक वाहतूक, पर्यावरण, जलनि:सारन, पदपथ, औद्योगिक परिसर याबाबत सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे महापालिकेच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन केले.

अण्णा बोदडे सहाय्यक आयुक्त, माहिती व जनसंपर्क विभाग यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही पंधरावडाबाबत माहिती दिली. नविन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे. लोकशाही सुदृढ व्हावी, यासाठी समाजातील सर्व लोकांना सतत शिक्षणाद्वारे जागृत करण्यासाठी पंधरावड्याचे आयोजन केले असून प्रत्येकाने मतदानात सहाभागी होवून आपल्या बरोबरच आपल्या सहका-यांनाही त्यात सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button