breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जनगणनेसाठी पालिका प्रशासन ‘सज्ज’, अधिका-यांचे कामकाज सुरू

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

भारताची जनगणना 2021 चे कामकाज सुरू करण्यात आले असून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने पिंपरी-चिंचवडमधील जनगणना करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी महापालिकेतील दोन अधिका-यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 5 हजार प्रगणक (शिक्षक) शहरात राहणा-या लोकांची गणना करणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माहिती व जनसंपर्क अधिकारी आण्णा बोदडे आणि कायदा विभागाचे सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांची मास्टर ट्रेनर म्हणून निमणूक झाली आहे. यामध्ये 65 फिल्ड ट्रेनर काम पाहणार आहेत. मास्टर ट्रेनर यांच्याकडून फिल्ड ट्रेनर यांना वेळोवेळी मार्गदर्शन होणार आहे. त्यांच्याअंतर्गत तब्बल 5000 प्रगणक घरोघरी जाऊन प्रत्यक्ष माहिती संकलीत करणार आहेत. साधारण एक फिल्ड ट्रेनर 150 ते 200 प्रगणकाकडून माहिती संकलीत करणार आहे. कुटुंबातील सदस्यांची संख्या, घराचे वर्णन, पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत, शौचालय, स्वयपाक गॅस, वाहन आदींसह जातीची नोंद घेतली जाणार आहे.

जनगणनेची संदर्भसुची 1 मार्च 2021 रोजी जाहीर होणार आहे. 1 मे ते 15 जून दरम्यान जनगणना होईल. फेब्रुवारी 2021 मध्ये बेघरांचा सर्वे केला जाईल. या जनगणनेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची प्रधान जनगणना अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील आणि अजित पवार यांची सह जनगणना अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. तर, क्षेत्रीय अधिका-यांची चार्ज अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

मोबाईल अॅपद्वारे जनगणना होणार

जनगणना करण्यासाठी प्रगणकासमोर दोन पर्याय ठेवले आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन जनगणना केली जाणार आहे. त्यानुसार त्यांच्या मानधनात देखील बदल केला आहे. एनपीआर विभागाचे स्वतंत्र मोबाईल अॅप असून त्याद्वारे नागरिकांची माहिती आणि वर्णन नोंद केले जाणार आहे. ऑफलाईन जनगणना करणा-या प्रगणकाला 15 हजार मानधन दिले जाणार आहे. तर, अॅपद्वारे गणना करणा-या प्रगणकाला सुमारे 25 हजार मानधन निश्चित केले आहे, अशी माहिती मास्टर ट्रेनर आण्णा बोदडे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button