breaking-newsताज्या घडामोडीलेख

या वस्तूंवर असतात करोडो विषाणू, वेळच्या वेळी बदलल्या पाहिजे

दररोजच्या धावपळीत आपलं अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. दैनंदिन वापरातील अनेक वस्तू बदलल्या पाहिजेत याचं आपल्याला भानच राहत नाही. कंगवा, दात घासायचा ब्रश, भांडी घासायचा स्क्रब यासारख्या अनेक वस्तू आहेत ज्या-ज्या काही काळानं खराब होतात. या वस्तू वेळच्या वेळी बदलल्या गेल्या नाहीत तर त्याचा आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन वापरातील अनेक वस्तू बदलणं गरजेचं आहे..पाहुयात कोणत्या आहेत त्या गोष्टी…

दात घासायचा ब्रश-
दैनंदिन वापरातील ही महत्त्वपूर्ण वस्तू असून याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी येतो. एका संशोधनाअंती सिद्ध झालं आहे की, ब्रशवर १ कोटींहून अधिक जिवाणू असतात. म्हणूनच टूथब्रश स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. अमेरिकन डेंटल असोशिएशननं सांगितल्यानुसार तीन ते चार महिन्यातून एकदा टूथब्रश बदलावा. शिवाय ब्रश दररोज स्वच्छ केला पाहिजे.

कंगवा-
अनेकजण वर्षानुवर्ष एकच कंगवा वापरतात. ही सवय चुकीची आहे. यामुळे केसामध्ये जंतुसंसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. एखाद्या कंगव्याची सवय झालेली असते. पण ही सवय केसाच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरु शकते. तुम्ही देखील गेली अनेक वर्ष एकच कंगवा वापरत असाल तर तो आधी बदला. तसंच कंगवा विकत घेतानाही काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. निकृष्ट दर्जाचा कंगवा विकत घेतला तर केसाच्या समस्या उद्भवण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे केस गळती किंवा कोंड्याचा त्रास होऊ शकतो. तसंच वापरातला कंगवा वेगळच्या वेळी स्वच्छ केला पाहिजे. काही तास साबणाच्या पाण्यात भिजवून ठेवल्यानं तो स्वच्छ होतो. तज्ज्ञांच्या मते, दर सहा महिन्यांनी कंगवा बदलला पाहिजे. असं केल्यानं केस गळती आणि ते तुटण्याचं प्रमाण कमी होतं.

भांडी घासायचा स्क्रब-
भांडी घासण्यासाठी वापरण्यात येणारा स्क्रब किंवा स्पॉंज दर दोन ते चार आठवड्यांनी बदलला पाहिजे. दैनंदिन वापरातील काही गोष्टी सतत बदलल्यानं आर्थिक नुकसान होतं असा विचार करणारे अनेक जण आहेत. पण वर्षानुवर्ष त्याच-त्याच गोष्टी वापरल्यानं झालेला अपाय महागात पडू शकतो, हे लोकांच्या लक्षातच येत नाही. त्यामुळे काही गोष्टी वेळच्या वेळी बदलल्या पाहिजेत. त्यातही भांडी घासायचा स्क्रब आणि स्पाँज बदलला पाहिजे. कारण त्या भांड्यातून आपण जेवण करतो. त्या स्क्रब किंवा स्पाँजमधील जंतू पोटात जाऊन अपाय होऊ शकतो. या दोन्ही गोष्टी बदलण्यासाठी त्या खराब होण्याची वाट न बघता दर दोन ते चार आठवड्यातून एकदा बदलावे.

भाजी चिरण्याचा बोर्ड-
स्वयंपाकघरातील भांडी घासायचा स्क्रब किंवा स्पॉंज वेळच्या वेळी बदलणं जसं गरजेचं आहे तसा भाजी चिरण्याचा बोर्डही बदलला गेला पाहिजे. कारण या बोर्डचा वापर सर्वाधिक होतो. म्हणून तो देखील नियमितपणे बदलणं आवश्यक आहे. आपण दररोज भाजी चिरण्याचा बोर्ड स्वच्छ धु कितीही चांगल्या प्रकारे चॉपिंग बोर्डला स्वच्छ धुऊन ठेवत असलो तरीही त्याला जंतू चिकटलेले असतात. म्हणून चॉपिंग बोर्ड दर तीन महिन्यांनी बदलणं आवश्यक आहे. शिवाय लाकडी चॉपिंग बोर्डपेक्षा धातूपासून बनवलेल्या चॉपिंग बोर्डचा उपयोग करणं आरोग्याच्या दृष्टीनं अधिक फायदेशीर ठरतं.

उशी-
झोपप्रेमींसाठी पलंग हा जिव्हाळ्याचा विषय असतो. चांगली झोप होणं हे मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्यादृष्टीनं चांगलं असतं. पण तुम्ही अनेक वर्ष एकच उशी वापरता का? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुम्हाला झोपेच्या समस्या सतावत असतील. या त्रासापासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर वेळच्या वेळी उशी बदलली पाहिजे. उशी सर्वसाधारणपणे एक-दोन वर्षांनी बदलली पाहिजे. आपण उशीवर डोकं ठेवतो तेव्हा केसातील कोंडा आणि तेल कापूस शोषून घेतो. अशा वेळी वर्षानुवर्षं एकच उशी वापरल्यामुळे जंतुसंसर्ग किंवा झोपेच्या समस्या निर्माण होतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button