breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

‘या’ खासदाराने खासदार कोट्यातील विमान तिकीटं वापरुन ३३ मजुरांना पाठवलं स्वगृही

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशामध्ये २५ मार्चपासून  लॉकडाउन सुरु आहे. १ मेपासून सुरु झालेल्या लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यामध्ये बरेच निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी स्थलांतरित मजुरांच्या अडचणी अद्याप संपलेल्या नाहीत. लॉकडाउनची घोषणा झाल्यापासून हजारो मुजरांनी चालतच आपल्या मूळ राज्यात परत जाण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रीय महामार्गांवर मजुरांचे जथ्थेच्या जथ्थे दिसू लागले. मे महिन्याच्या सुरुवातीपासून काही श्रमिक विशेष ट्रेन सुरु करण्यात आल्या मात्र त्यानंतरही मजुरांचा घरी जाण्यासाठीचा संघर्ष सुरुच असल्याचे चित्र दिसत आहे. असं असतानाच अनेकजण या मजुरांच्या मदतीसाठी धावून आल्याचे पहायला मिळालं. सोनू सूदपासून ते अनेक सेवाभावी संस्थांनी मजुरांना घरी परतण्यास मदत करण्यास सुरुवात करुन अनेक दिवस उलटले आहे. मात्र मजुरांची संख्या खूप जास्त असल्याने अद्यापही त्यांनी घरी पाठवण्याचे काम सुरु आहे. त्यातच आता आम आदमी पार्टी म्हणजेच आपचे राज्यसभेचे खासदार संजय सिंग यांनीही आगळ्यावेगळ्याप्रकारे स्थलांतरित मजुरांना मदत केली आहे. यासंदर्भातील माहिती आपच्या ट्विटर हॅण्डलवरुन देण्यात आली आहे.

आपच्या सुत्रांच्या हवाल्याने पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार दिल्लीच्या जागेसाठी राज्य सभेमध्ये आपचे प्रतिनिधित्व करणारे खासदार सिंग यांनी खासदार कोट्यातील तिकीटं स्थलांतरित मजुरांना दिली आहे. खासदार कोट्यामधून देण्यात आलेल्या तिकिटांचा वापर या खासदाराने ३३ स्थलांतरित मजुरांना दिल्लीवरुन बिहारमधील पाटण्याला पाठवलं आहे. दरवर्षी प्रत्येक खासदाराला विशेष कोट्याअंतर्गत ३४ बिझनेस क्लासची तिकीटं दिली जातात. यापैकीच ३३ तिकीटं सिंग यांनी वापरल्याचे सांगितले जात आहेत. यासंदर्भात आपनेही ट्विट करुन माहिती दिली आहे. “एक खासदार स्थलांतरित कामगारांसाठी कशाप्रकारे देवदूत होऊन मदतीला आला आणि त्याने या मजुरांना कुटुंबाकडे पाठवलं पाहा. आपचे वरिष्ठ नेता आणि माननिय खासदार संजय सिंग यांनी त्यांच्या कोट्यातील तिकीटांचा वापर करुन स्थलांतरित कामगारांना परत पाठवलं. इतकचं नाही तर ते व्यवस्थित पोहचतील याची खात्री करुन घेण्यासाठी ते स्वत: या विमानाने स्थलांतरितांबरोबर गेले,” असं आपने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सिंग यांच्या या निर्णयाचे आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही कौतुक केलं आहे. तसेच यामधून इतरांनाही प्रेरणा घ्यावी असं मत केजरीवाल यांनी व्यक्त केलं आहे. “संजय यांच्या या कामाने सर्वांना प्रेरणा मिळेल. देवाने ज्यांना मदत करण्यासाठी साधने उपलब्ध करुन दिली आहेत ती त्यांनी दुसऱ्यांच्या मदतीसाठी वापरावीत. संजयजी अभिनंदानास पात्र आहेत,” असं केजरीवाल यांनी ट्विटवरुन म्हटलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button