breaking-newsमनोरंजन

“ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर…’ पाकिस्तानमध्येही रिलीज होणार

बॉलिवूडमधील सिनेमांना पाकिस्तानमध्ये रिलीज केले जाणे खूप अवघड मानले जाते. तिथल्या सेन्सॉर बोर्डाकडून मंजूरी मिळणे एकतर अशक्‍य असते किंवा मंजूरी मिळाली तरी त्यामध्ये खूप कट्‌स दिले जातात. मात्र माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या जीवनावरील “द ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर’पाकिस्तानमध्ये रिलीज करण्यास तिथल्या सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिली आहे. सिनेमामध्ये किरकोळ कट्‌स सुचवून 18 जानेवरीला सिनेमा रिलीज करण्याची परवानगी दिली गेली आहे. “सीबीएफसी’चे प्रमुख डॅलिएल गिलानी यांनी ही माहिती दिली आहे.

अनुपम खेर हे मनमोहन सिंग यांची भूमिका साकारत असल्याने या सिनेमाबाबत राजकीय वर्तुळात खूपच उत्सुकता व्यक्‍त होत आहे. सिनेमा राजकीय लाभासाठी वापरला असल्याची टीका जरी विरोधकांकडून होत आहे. पण त्यातील व्यक्तिरेखा आणि कथेची मांडणी याबाबत सर्वांच्याच मनात उत्सुकता कायम आहे. संजय बारु यांच्या पुस्तकावर हा सिनेमा आधारलेला आहे. पुस्तक प्रकाशित झाले तेंव्हापासूनच त्याची चर्चा झाली होती. त्या राजकीय चर्चेमुळेच पाकिस्तानमध्ये सिनेमा रिलीज होण्यास परवानगी मिळाली असावी, असे म्हणता येऊ शकेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button