breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

…तर कोल्हापुरी हिसका दाखवू; वीजबिल माफीसाठी कोल्हापूरकरांचा सरकारला इशारा

लॉकडाऊन काळातील वीजबिल माफीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. ते वीजबिल माफ व्हावे, या मागणीसाठी कोल्हापूर शहरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये कोल्हापूर शहर आणि परिसरातील अनेक संघटना सहभागी झाल्या आहेत. या रॅलीमध्ये संघटना आपली वाहनं घेऊन सहभागी झाल्याने या मोर्चाला भव्य रूप मिळालं आहे.

गांधी मैदानपासून सुरू झालेली ही रॅली शहरातील विविध भागातून महामार्गावर पोहचली. त्यानंतर तावडे हॉटेलमार्गे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ही रॅली निघाली. लॉकडाउनच्या दरम्यान अनेकांचे व्यवसाय बंद पडले होते. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. रिक्षा व्यवसाय ठप्प झाला होता. त्यामुळे या काळातील वीजबिल माफ करावीत अशा पद्धतीची मागणी कोल्हापुरात जोर धरून होती. कोल्हापूर शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये आम्ही बिल भरणार नाही, अशा आशयाचे होर्डिंग लागले आहेत. जर कोण विजेचे कनेक्शन तोडण्यासाठी आले तर त्याला कोल्हापुरी हिसका दाखवू असा इशारा या होर्डिंगच्या माध्यमातून दिला आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button