breaking-newsपिंपरी / चिंचवड

यांत्रिकी पद्धतीने रस्ते साफसफाईच्या टेंडरवरील हरकतीची उद्या सुनावणी

नगरसेविका सिमा सावळेंनी घेतली होती हरकत

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

महपलिका हद्दीतील रस्ते यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करण्याच्या ७४२ कोटी रुपयांच्या टेंडर मध्येच प्रशासनाने परस्पर फेरबदल केले आहेत. स्थायी समिती सभा आणि सर्वसाधारण सभेपुढे सादर केलेला प्रस्ताव आणि प्रत्यक्षातील टेंडर मध्ये जमीनअस्मानाचा फरक आहे. वाढीव वाहनसंख्या, वाढीव मनुष्यबळ यांमुळे टेंडरचा खर्च वार्षिक ९७ कोटींवरुन १०६ कोटींवर गेला आहे. आर्थिक लागेबांधे, सातत्याने बदलेल्या अटी शर्ती,
भ्रष्टाचार, नियमांचे उल्लंघन, सर्वपक्षीय राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप, कष्टकरी कामगारांवर पडणारी बेकारीची कुऱ्हाड आणि वाढीव खर्च या मुद्द्यांमुळे भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी या कामाला विरोध केला. सावळे यांनी लोखी स्वरुपात हरकत घेतल्यानंतर मनपा आयुक्तांनी टेंडरचे कामकाज स्थगित केले होते. उद्या दि. १८ मे रोजी मनपा आयुक्तांसमक्ष सावळे यांनी घेतलेल्या हरकतीची सुनावणी होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ८ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या रस्त्यांची यांत्रिकीकर पद्धतीने साफ सफाई करण्यासाठी ७४२ कोटी रुपयांचे टेंडर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आले होते. या कामासाठी एक संयुक्त टेंडर न काढता सहा विविध ‘पॅकेजेस’ मध्ये विभागणी करत ८ वर्ष कालावधीसाठी टेंडर काढण्याची शिफारस या कामाचे सल्लागार मे. टंडन अर्बन सोल्युशन्स यांनी केली. स्थायी समिती व मनपा सर्वसाधारण सभेमध्ये ” आयत्या वेळीचा” विषय मांडून या कामाचे टेंडर काढण्यासाठी मान्यता घेण्यात आली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी
टेंडर प्रसिद्ध करण्यात आले. मात्र आर्थिक लागेबांधे व काही राजकीय व्यक्तींच्या हट्टामुळे टेंडरच्या अटी शर्ती बदलण्यात आल्या. वाढीव वाहनसंख्या, वाढीव मनुष्यबळ यांमुळे टेंडरचा खर्च वार्षिक ९७ कोटींवरुन १०६ कोटींवर गेला. त्यानंतर दोन – तीन महिने मुदतवाढ , शुध्दीपत्रक असा सोपस्कार करण्यात आले. टेंडर मध्ये ६ पॅकेजसाठी ८ कंत्राटदारांनी आलटून पालटून सहभाग घेतल्याचे तांत्रिक छाननीत स्पष्ट झाले. निविदेमध्ये सहभागी झालेले सहा ठेकेदार संगनमताने आणि रिंग करून सहभागी झाल्याचा आरोपही
झाले.

आर्थिक लागेबांधे, सातत्याने बदलेल्या अटी शर्ती, भ्रष्टाचार, नियमांचे उल्लंघन, सर्वक्षीय राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप, कष्टकरी कामगारांवर पडणारी बेकारीची कुऱ्हाड आणि वाढीव खर्च या मुद्द्यांमुळे भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी या कामाला जोरदार विरोध केला. “मनपा सर्वसाधारण सभेने दिलेल्या मान्यतेप्रमाणे टेंडर न काढता त्यात परस्पर बदल केला गेला”, सिमा सावळे यांनी उपस्थित केलेल्या तांत्रिक मुद्द्यामुळे टेंडर रेटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची चांगलीच गोची झाली. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये बेकायदेशीर उपसूचना घुसवून यांत्रिकपद्धतीने साफसफाई कामाच्या टेंडर मध्ये केल्या बदलांना मागच्या दराने मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न काही महाभागांनी केला. मात्र सिमा सावळेंनी याला कडक विरोध करत हा प्रयत्न हणून पाडला. त्यानंतर आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी सावळे यांनी घेतलेल्या हरकतीची दखल घेत टेंडर प्रक्रिया स्थगित केली.

मार्च महिन्यात अचानकपणे उद्‌भवलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे सावळे यांच्या हरकतीवर आयोजित केलेली सुनावणी दोन-तीन वेळा पुढे ढकलण्यात आली. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत असतानाच
आयुक्तांनी सिमा सावळे यांनी घेतलेल्या हरकतीची सुनावणी उद्या सोमवार दि १८ मे रोजी आयुक्त कक्षात आयोजित केली आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button