breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

रशियन एथलीटला कामासाठी महिन्याला दीड कोटीची ऑफर

मुंबई | रशियाची देखणी उंचउडीपटू दारया क्लिशिना हिला हाय क्लास एस्कोर्ट (हाय प्रोफाईल साथीदार, विशेषतः लैंगिक संबंधासाठी) बनण्यासाठी तब्बल एक लाख 60 हजार स्टर्लिंग पौंड दरमहा (जवळपास दीड कोटी रुपये) किंवा वर्षाला 20 लाख स्टर्लिंग पौंड अशा भरगच्च रकमेची ऑफर आली आहे. स्वतः क्लिशिना हिनेच या खळबळजनक माहितीचा गौप्यस्फोट केला आहे.

ही 29 वर्षीय खेळाडू विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यविजेती असून ती सध्या अमेरिकेतील अटलांटा येथे वास्तव्याला आहे. रशियन संकेतस्थळ स्पोर्टस् डॉट आरयूशी बोलताना तिने ही धक्कादायक माहिती उघड केली आहे. अमेरिकेतील एका अनोळखी व्यक्तीने इन्स्टाग्रामवर एका थेट संदेशाद्वारे आपल्याला जवळपास सहा महिन्यांपूर्वी ही ऑफर देण्यात आली होती आणि आपल्याला अशा ऑफरसह कुणी संपर्क करेल याचा आपण विचारसुध्दा केला नव्हता असे तिने म्हटले आहे. मी अजिबात न चिडता शांतपणे त्याला माफ करा, पण मला तुमच्या या प्रस्तावात अजिबात रस नाही, असे उत्तर दिल्याचे तिने सांगितले. यावर पुन्हा मला पाठविलेल्या संदेशात त्याने नमूद केले की, थांब, घाई करु नकोस. तुला अजुन माझी काय ऑफर आहे आणि त्याच्या काय अटी-शर्थी आहेत ते माहित नाही. तुला मिळणारी रक्कम खूप म्हणजे खूपच मोठी असणार आहे. दरमहा दोन लाख डॉलर.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button