breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

यवतमाळमधील ११ जणांचा पुण्यातील ‘करोना’ग्रस्तांसोबत प्रवास

यवतमाळ – करोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग झालेल्या पुण्यातील ‘त्या’ प्रवाशांबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील ११ जणांनी प्रवास केल्याचं उघडकीस आल्यानं प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या सर्व ११ जणांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आज दुपारी त्यांची आरोग्य तपासणी होणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील तीन कुटुंबातील अकरा जण २४ फेब्रुवारीला दुबईला गेले होते. तिथून १ मार्चला ते परत आले. प्राथमिक तपासणीनंतर यातील एक तरुण शिक्षणाच्या निमित्तानं पुण्याला गेला. मात्र, दुबईहून आलेल्या दोन पुणेकरांना करोनाचा संसर्ग झाल्याचं उघडकीस येताच खळबळ उडाली. त्यांच्यासोबत गेलेल्या प्रवाशांचा शोध घेतला असता यवतमाळ जिल्ह्यातील ते ११ जण करोनाबाधितांसोबत विमानात होते ही माहिती समोर आली. त्यामुळं पुण्याला गेलेल्या तरुणाची पुन्हा आरोग्य तपासणी केली असता त्याची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं समजतं. त्यामुळं इतर प्रवाशांच्या बाबतीतही संशय व्यक्त केला जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील हे प्रवासी दुबईहून परतल्यापासून गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी वावरले आहेत. त्यामुळं चिंतेत भर पडली आहे.

‘आम्हाला कसलाही त्रास नाही. कालपर्यंत आमच्याशी कोणी संपर्क साधला नाही. कालपासून अचानक अनेकांचे फोन येत आहेत. घरातून बाहेर पडण्यास आम्हाला मनाई करण्यात आली आहे, असं या संशयितांचं म्हणणं आहे. या कुटुंबातील एक मुलगी वर्ध्याला शिकत असल्याचे समजते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button