breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

रिक्षेची तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना आमदाराविरोधात गुन्हा

पुणे –  खेडमध्ये रिक्षेची तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना आमदार सुरेश गोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आमदार गोरे व त्यांचे १० ते १२ कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. यादरम्यान त्यांनी रिक्षेची तोडफोड केली होती.

पुणे- नाशिक महामार्गावर चाकण येथील तळेगाव चौकात वाहतूक कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी शिवसेना आमदार गोरे व त्यांचे १० ते १२ कार्यकर्ते रविवारी रात्री रस्त्यावर उतरले. हातात लाठ्या- काठ्या घेऊन रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांनी रिक्षांची तोडफोड केली. वाहतूक कोंडीविरोधात कायदा हातात घेणाऱ्या आमदार गोरे यांच्यावर टीका होत होती. अखेर या प्रकरणी सोमवारी चाकण पोलिसांनी आमदार गोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button