breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडसाठी न्यायाधीशांची संख्या वाढविण्याची गरज – न्यायाधीश एस. बी. आगरवाल

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड न्यायालयात अनेक समस्या आहेत. तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध झालेल्या नेहरूनगर येथील महापालिकेच्या इमारतीमध्ये पिंपरी येथील न्यायालय तातडीने स्थलांतरित होणे अत्यंत आवश्‍यक आहे, पिंपरी-चिंचवडकरिता हायकोर्टाने मान्य केलेल्या न्यायाधीशांची संख्या वाढविण्याची गरज आहे, असे मत पुणे जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश एस. बी. आगरवाल यांनी व्यक्त केले.

न्यायाधीश एस. बी. आगरवाल यांनी पिंपरी न्यायालयास अचानक भेट दिली. त्यांनी पिंपरी न्यायालयातील कामकाज व अडचणींची माहिती घेतली. यावेळी पिंपरी न्यायालयातील मुख्य न्यायाधीश के. एम. पिंगळे, ए. यू. सुपेकर, एन. टी. भोसले व एस. जी. आगरवाल उपस्थित होते. यावेळी पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट्‌स बार असोसिएशनतर्फे पुणे जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश आगरवाल यांचे स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट्‌स बार असोसिएशनचे अध्यक्ष वकील. सुनील कडुसकर, उपाध्यक्ष वकील. योगेश थंबा, सचिव वकील. गोरख कुंभार, सहसचिव वकील अंकुश एम. गोयल, खजिनदार संतोष मोरे, ऑडिटर वकील. महेश टेमगिरे, सदस्य वकील पूनम राउत, वकील निलेश ठोकळ, वकील निलेश ठोकळ, वकील विजय बाबर, वकील. केशव घोगरे व बार चे वकील मोनिका सचवाणी, वकील फ्रान्सिस भोसले, वकील अनिल सेजवानी व बारचे माजी अध्यक्ष वकील सुहास पडवळ, वकील सतीश गोरडे, वकील विलास कुटे, वकील सुनील कड व वकील सुदाम साने, वकील पद्‌मावती पाटील, ऍड. दीपा कदम, वकील गणेश राउत, वकील दिलीप शिंगोटे, ऍड. बाळासाहेब रणपिसे, ऍड. प्रसन्ना लोखंडे, वकील बी. के. कांबळे हे देखील उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button