breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘तर, कोरोना अजूनच रुद्ररुप धारण करेल’; WHO ने दिला इशारा

जीवघेण्या कोरोनामुळे जगात निर्माण झालेली भयावह परिस्थिती अद्यापही आटोक्यात आलेली नाही. आरोग्याशी संबंधित पूर्वकाळजी जर सर्वच देशांनी घेतली नाही, तर ही महामारी अजूनच रुद्ररुप धारण करेल अशी अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त करत एकप्रकारे इशाराच दिला आहे. त्याचबरोबर चुकीच्या दिशेने अनेक देश वाटचाल करत असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस यांनी म्हटलंय…

अद्यापही लोकांचा कोरोना संसर्ग पहिल्या क्रमांकाचा शत्रू असल्याचं टेड्रोस यांनी म्हटलंय… त्यांनी हे वक्तव्य जिनिव्ही येथे कोरोनासंबंधी बोलताना केलं. मुलभूत नियमांचे जर पालन केले नाही तर महामारी गंभीर, गंभीर आणि अतीगंभीर रुप धारण करेल, असंही टेड्रोस यांनी म्हटलंय…

जगभरात सध्या १ कोटी ३२ लाख लोक कोरोनाबाधित आहेत. तर साडे पाच लाखांच्या पुढे मृतांची संख्या गेली आहे. टेड्रोस यांनी यावेळी रविवारी २ लाख ३० हजार नवे रुग्ण मिळाले असून यामधील ८० टक्के रुग्ण १० देशांमधील असून फक्त दोन देशांमध्ये ५० टक्के रुग्ण सापडल्याचे सांगितले. कोरोनाचा सर्वात जास्त फटका अमेरिका आणि ब्राझिलला या दोन देशांना बसला आहे…

अमेरिकेसारख्या देशांमध्ये मर्यादित किंवा भौगोलिक लॉकडाउन केला जावा असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. जेणेकरुन परिस्थिती हाताबाहेर गेलेल्या काही ठराविक भागांमधील संसर्ग रोखण्यात यश मिळेल. जागतिक आरोग्य संघटनेने शाळा सुरु करण्यासाठी घाई केली जाऊ नये असे सांगताना शाळांना राजकीय फूटबॉल बनवू नका असे आवाहनही केले आहे. दरम्यान अमेरिकेकडून अद्यापही आपण जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडल्याचं अधिकृत पत्र मिळालं नसल्याचं टेड्रोस यांनी सांगितलंय…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button