breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘म्हाडा’च्या सदनिकांसाठी एका दिवसात 81 हजारांची ऑनलाइन नोंदणी

पुणे |महाईन्यूज|

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) सदनिकांसाठी एकाच दिवसात तब्बल 81 हजार जणांनी ऑनलाइन नोंदणी झाली आहे. इच्छुकांना येत्या 11 जानेवारीपर्यंत ही नोंदणी करता येणार असल्याचे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी सांगितले.

पुण्यासह कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील पाच हजार 647 सदनिकांसाठी 22 जानेवारीला सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीत सहभाग घेण्यासाठी कालपासून (दि.10) ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या ऑनलाइन नोंदणीचा शुभारंभ गुरुवारी (दि.10) सायंकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला.

माने म्हणाले, “”पुणे म्हाडाची ही आतापर्यंतची सर्वांत मोठी सोडत आहे. याआधी एवढ्या मोठ्या संख्येने सदनिकांची सोडत कधीच झाली नाही. या सोडतीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. काल सायंकाळपासून आज सायंकाळपर्यंत तब्बल 1 लाख 34 हजार युजर्स झाले आहेत. यापैकी 81 हजार 4 जणांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्यांपैकी 72 हजार 907 जणांची नोंदणी मंजूर झाली आहे. 1 हजार 968 जणांची नोंदणी त्रुटींमुळे नाकारली गेली आहे. आणखी 6 हजार 98 जणांच्या नोंदणीची मंजुरी प्रलंबित आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button