ताज्या घडामोडीमुंबई

तिसऱ्या लाटेत तरुण वर्ग सर्वाधिक बाधित

ठाणे महापालिका क्षेत्रात ३१ ते ४० वयोगटातील ४ हजार ७१ सक्रिय रुग्ण; रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जास्त

ठाणे | करोनाच्या तिसऱ्या लाटेत ३१ ते ४० वयोगटातील नागरिकांना बाधा होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. पालिका क्षेत्रात या वयोगटातील ४ हजार ७१ सक्रिय रुग्ण आहेत. मात्र, या लाटेत रुग्णांना सौम्य लक्षणे असल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीला १६ हजार २५० सक्रिय रुग्ण असून यापैकी सर्वाधिक म्हणजेच ४ हजार ७१ रुग्ण हे ३१ ते ४० वयोगटातील आहेत. मात्र, यामध्ये अनेकांना सौम्य लक्षणे किंवा काहींना लक्षणे नसल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. ठाणे महापालिका प्रशासनाने करोना रुग्णांची त्यांच्या वयोगटाप्रमाणे वर्गवारी केली आहे. यामध्ये ३१ ते ४० वयोगटातातील नागरिकांपाठोपाठ यंदाच्या लाटेत २१ ते ३० तसेच ४१ ते ५० वयोगटातील रुग्णांचाही समावेश आहे. २१ ते ३० वयोगटातील ३ हजार १०७ रुग्णांवर तर, ४१ ते ५० या वयोगटातील २ हजार ९७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कल्याण : कारवाईसाठी गेलेल्या सहाय्यक आयुक्तांच्या पथकावर मार्केटमधील व्यापाऱ्यांनी केला ‘कांदा हल्ला’
कल्याण: कारवाईसाठी गेलेल्या सहाय्यक आयुक्तांच्या पथकावर मार्केटमधील व्यापाऱ्यांनी केला ‘कांदा हल्ला’
या वयोगटाचे कामानिमित्त घरबाहेर पडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जास्त करून रुग्ण हे या वयोगटातील आढळून येत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तर, या लाटेत मृत्यूचे प्रमाण कमी असून ठाणे महापालिका क्षेत्रात मागील दोन आठवडय़ात दोन रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. हे रुग्ण ४५ वर्षांवरील होते, अशी माहिती ठाणे महापालिका प्रशासनामार्फत देण्यात आली.

लहान मुलांवर घरीच उपचार

ठाणे शहरात ० ते १० वयोगटातील ५७६ मुले सध्या करोना बाधित आहेत. परंतू, यांच्यामध्ये सौम्य लक्षणे असल्यामुळे यापैकी एकाही मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. करोनासाठी वापरण्यात येणारे औषध १८ वर्षांखालील मुलांना देणे शक्य नाही. त्यामुळे सर्दी, खोकला किंवा ताप या आजारांवर त्यांच्या वयोगटासाठी वापरण्यात येणारी औषधेच या वयोगटाला दिली जात आहेत, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button