breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

मोबाईल पेमेंट App ‘भीम’चा डाटा लीक?

नवी दिल्ली | नरेंद्र मोदी सरकारकडून जोरदार प्रचार करण्यात आलेल्या ‘भीम’ अॅप सध्या वादात सापडलंय. या अॅपचा डाटा लीक झाल्याचा दावा एका इस्रायली सायबर सिक्युरिटी फर्मनं केला होता. परंतु, ‘भीम’ वापरकर्त्यांचा डाटा कोणत्याही प्रकारे लीक झालेला नाही असं सांगत भारतानं इस्रायली संस्थेचा दावा खोडून काढलाय. तसंच पेमेंट करण्यासाठी हे अॅप सुरक्षित असल्याचं नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या भारत सरकारच्या संस्थेकडून स्पष्ट करण्यात आलं.

मोबाईल पेमेंट अॅप असलेल्या ‘भीम’ अॅपचे जवळपास ७२.६ लाख युझर्स आहेत. ‘व्हीपीएन मेन्टॉर’ या सायबर सिक्युरिटी फर्मनं केलेल्या दाव्यानुसार या अॅपच्या युझर्सची महत्त्वाची माहिती लीक झालीय. या माहितीत युझर्सच नाव, जन्मतारीख, वय, लिंग, घराचा पत्ता, आधारकार्ड अशा संवेदनशील माहितीचा समावेश आहे. याचा फटाक संपूर्ण भारतातील लोकांना बसू शकतो. याचा फायदा उचलत हॅकर्स आणि सायबर गुन्हेगार फसवणूक, चोरी आणि सायबर हल्लेही करू शकतात, असा दावा व्हीपीएननं केला होता. 

केंद्र सरकारच्या संयुक्त सहकार्यानं ‘सीएससी – ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस’ या कंपनीनं ‘भीम’ हे अॅप तयार केलं. नोटबंदीनंतरच्या काळात मोदी सरकारकडून राबवण्यात आलेल्या ‘डिजिटल भारत’ या संकल्पनेला उभारी देताना मोदी सरकारनं या अॅपचा प्रचार केला होता. परंतु, या अॅपमधील महत्त्वाचा डाटा हा ‘अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस एस-३ बकेट’मध्ये सेव्ह झाल्याचा दावा इस्त्रायली फर्मनं केला होता.

‘भीम’ अॅपचा डाटा लीक झाला असल्याच्या काही बातम्या समोर आल्या आहेत. परंतु, भीम अॅप युझर्सच्या डेटा सुरक्षितेबाबत तडजोड करत नाही. त्यामुळे अशा खोट्या बातम्यांपासून नागरिकांनी सावध राहावं, असं स्पष्टीकरण भारत सरकारकडून देण्यात आलंय. ‘एनपीसीआय अत्यंत उच्च दर्जाचे सुरक्षा तंत्रज्ञान वापरते आणि युझर्सच्या डेटा सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. पेमेंटची अत्याधुनिक सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि पुढेही राहू’ असंही यात म्हटलं गेलंय. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button