breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

अजित पवारांचा शपथविधी, राष्ट्रवादीची भाजपासोबत युती; मोदी-पवार भेटीतील हीच रणनीती?

महाईन्यूज | मुंबई

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर शिवसेना-भाजपात मुख्यमंत्रिपदावरुन वाद झाला. त्यानंतर जवळपास महिनाभर सत्तासंघर्षात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन करुन सत्ता मिळविली आहे. या संपूर्ण घडामोडीत अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांचे ८० तासांचे सरकार हा घटनाक्रम मोठा आहे. नेमकं शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत काय घडलं होतं? अजित पवारांचा शपथविधी शरद पवारांनाच सांगून झाला होता का? याबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. आजतक या हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवारांनी मला सांगितले की, शरद पवारांशी बोलणं झालेलं आहे. याबाबत अनेक दिवसांपासून बातचीत सुरुच होती.

ज्यावेळी अजित पवारांनी समर्थनाची बाब पुढे आणली त्यानंतर आम्ही राज्यपालांना जाऊन पत्र सोपवलं. काही तांत्रिक बाबींमुळे शपथविधी लवकर झालेला आहे. मी स्वत: राष्ट्रवादीच्या आमदारांशी बोललो होतो. त्यांनीही सांगितले की, शरद पवारांना याबाबत सगळी माहिती आहे. तसेच मोदी भेटीतील काही गोष्टी शरद पवारांनी सांगितल्या असल्या तरी संपूर्ण भेटीत काय काय बोलणं झालं? ही पूर्ण माहिती पवारांनी सांगितली नाही. या भेटीबाबत योग्य वेळी नरेंद्र मोदी हे भाष्य करतील. शरद पवार जे सांगतायेत ते त्यांच्या फायद्याचं आहे तेवढचं. आम्ही अजित पवारांसोबत सरकार बनविले त्यावेळी आमच्याकडे नंबर होते. मात्र सर्वांना माहिती आहे राष्ट्रवादी जे करते ते कधी सांगत नाही असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button