breaking-newsमनोरंजन

अर्जुन कपूर-परिणिती चोपडा यांच्या चित्रपटात सर्वांत महागडे गाणे

अर्जुन कपूर आणि परिणिती चोपडा यांच्या आगामी चित्रपटातील गाणे सर्वांत महागडे ठरले आहे. ‘तू मेरी मैं तेरा’ या गाण्याच्या शूटिंगसाठी 5.5 कोटी इतका खर्च आला आहे. हे गाणे शूट करण्यासाठी ११ दिवस लागले आहेत. हा एक म्युझिकल रोमॅण्टिक चित्रपट आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि परिणिती चोपडावर एक गाणे चित्रित करण्यात आले असून हे गाणे नुकतेच शूट करण्यात आले.

ते सर्वांत महागडे गाणे ठरले आहे. निर्माता विपुल शाह यांनीच याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, माझ्या करिअरमधील सर्वांत महागडे गाणे मी शूट केले आहे. शाहने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, सर्वसामान्यपणे मी आकड्यांवर कधीच बोलत नाही. परंतु मी जे गाणे शूट केले आहे ते माझ्या करिअरमधील सर्वांत महागडे आहे. हे गाणे 18 ते 20 लोकेशनवर शूट करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button