breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

मोदीजी सोशल मीडियावरचे विदुषकी खेळ थांबवा : राहुल गांधी

दिल्ली | काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोना व्हायरसच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर विदुषकी खेळ खेळून भारताचा वेळ वाया घालवणं बंद करा, असं राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

शिवाय, चीनच्या पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेला एक व्हिडिओ देखील त्यांनी ट्विटबरोबर जोडला आहे. “भारत आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जात असताना, तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर विदुषकी खेळ खेळून भारताचा वेळ वाया घालवणं बंद करा. कोरोना व्हायरसचे आव्हान स्वीकाराताना प्रत्येक भारतीयावर लक्ष केंद्रीत करा” असं राहुल गांधींनी ट्विट केलं आहे.

प्रत्येक राष्ट्राच्या आयुष्यात असे काही क्षण असतात जेव्हा त्यांच्या नेत्यांची कसोटी लागते. एका खऱ्या नेत्याचं संपूर्ण लक्ष हे येऊ घातलेलं मोठं संकट टाळण्यावर असतं. कोरोना व्हायरसचा परिणाम भारत व भारतीय अर्थव्यवस्थेवर देखील होवू शकतो. कोरोना व्हायरसचा आपल्या जनतेला व अर्थव्यवस्थेला अत्यंत गंभीर धोका आहे.

मला वाटतं सरकार याकडे गांभिर्याने लक्ष देत नाही. यावर वेळीच उपाययोजना केल्या नाहीतर धोकादायक ठरू शकतं.” असंही राहुल गांधी ट्विटद्वारे म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button