breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मोदींशी तुलना करणे, हा शिवाजी महाराजांचा सन्मान, भाजप आमदारांची मुक्ताफळे

कोल्हापूर |महाईन्यूज|

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानच आहे, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी केले आहे. दरम्यान, आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाला हळवणकर यांच्याकडून समर्थन करण्यात आले.

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन देशातील राजकारण तापले आहे. संपूर्ण देशभरातून याचा विरोध केला जात आहे. महाराष्ट्रभरात विविध निदर्शने करण्यात आली. दरम्यान आणखी एका भाजप नेत्याने नरेंद्र मोदींच्या नावाने मुक्ताफळे उधळली आहेत.

सुरेश हळवणकर यांच्या वक्तव्यावरून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे. हळवणकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

हळवणकर म्हणाले होते की, नरेंद्र मोदी आणि शिवाजी महाराजांच्या कामामध्ये साम्य आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात काहीच चुकीचे नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान आहे. पुस्तकाच्या लेखकाचे मी समर्थन करतो. असे ते म्हणाले होते. तसेच हळवणकर यांनी मोदींनी सुरु केलेल्या योजनांचा संदर्भ देत त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button