breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोकळ्या भूखंडाभोवती सीमाभिंती बांधा

– नगरसेवक संदीप कस्पटे यांच्या प्राधिकरण अधिकाऱ्यांना सुचना

पिंपरी । प्रतिनिधी

प्रभाग क्र 26 हद्दीतील प्राधिकरणाच्या मोकळ्या भूखंडावर काही लोकांनी ताबा मिळविला होता. याबाबत नगरसेवक संदीप कस्पटे यांनी प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. तसेच संबधित नागरिकांना भुखंड खाली करण्याच्या सुचना दिल्या. पुन्हा अशा समस्या येऊ नयेत म्हणून अशा भुखंडाभोवती सीमाभिंती बांधण्याच्या सुचना नगरसेवक कस्पटे यांनी प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. नगरसेवक कस्पटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, मोकळ्या भूखंडांवर 70 ते 80 लोकसंख्या असणाऱ्या स्थलांतरित जनसमुहाणे अनधिकृत पणे कब्जा करण्याचा व झोपड्या टाकण्याचा प्रयत्न केला होता. ही बाबा निदर्शनास येताच नवनगर विकास प्राधिकरण संबंधीत अधिकारी व वाकड पोलीस स्टेशन यांना या गंभीर्यतेची कल्पना दिली. पोलीस बंदोबस्त घेऊन त्या लोकांना हा भूखंड खाली करणेची सक्तीची ताकीद देण्यात आली. भूखंड खाली करण्यासाठी त्यांना 2 दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे. नवनगर विकास प्राधिकरण अधिकारी यांना अश्या अडचणीना सामोरे जाऊ नये, या साठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक संदीप कस्पटे यांनी लेखी पत्र देऊन सतत पाठपुरावा केला. सीमाभिती विषयी निविदा काढण्यासाठी विभागास सूचना दिल्या होत्या, त्या नुसार कार्य चालू आहे. पुढच्या आठवड्यात नगरसेवक संदीप कस्पटे यांच्या सुचणे नुसार मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अश्या समस्या उद्भवू नये म्हणून प्राधान्य देऊन सीमाभितीचे कार्य चालू करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button