breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

जुन्या 5, 10 आणि 100 च्या नोटा मार्चनंतर चलनातून होणार बाद, आरबीआयची माहिती

मुंबई – 100, 10, 5 रुपयांच्या जुन्या नोटासंदर्भात आरबीआयकडून एक महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार 100, 10, 5 च्या सर्व जुन्या नोटा मार्च-एप्रिलनंतर चलनात नसणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांनी ही माहिती दिली आहे. या जुन्या नोटा मागे घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांच्या म्हणण्यानुसार, आरबीआय मार्च-एप्रिलपर्यंत चलनातील जुन्या 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर पडतील. वास्तविक, 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा बंद होण्याच्या अगोदरच याच्या नवीन नोटा यापूर्वीच चलनात आल्या आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2019 मध्ये 100 रुपयांची नवीन नोट चलनात आणली होती. खरं तर नोटाबंदीच्या वेळी 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्याने गोंधळ झाला होता. यामुळे आता आरबीआय अचानक कोणतीही जुनी नोट बंद करू इच्छित नाही, तर प्रथम त्याची नवीन नोट बाजारात चलनमध्ये आणली जाईल. त्यानंतरच जुन्या नोटा चलनातून काढल्या जातील असे आरबीआयचे म्हणणे आहे. दहा रुपयांच्या नाण्यांविषयी वेगवेगळा अफवा पसरविल्या जातात.

बरेच व्यापारी किंवा दुकानदार त्यांना घेण्यास नकार देत आहेत. यावर आरबीआयचे म्हणणे आहे की, ही बँकेसाठी अडचण आहे, म्हणून अशा अफवा टाळण्यासाठी बँक वेळोवेळी सल्ला देते. तरी देखील अनेक लोक चलनामध्ये 10 रुपयांचे नाणे घेण्यास नकार देतात. यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरी लोकांनी दहा रुपयांच्या नाण्यांविषयी कोणत्याही अफव्यांवर लक्ष देऊ नये.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button