breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘मेरे सपनो की राणी कब आयेगी तू’, व्हॅलेंटाईन डेला अशोक चव्हाणांचं प्रेमगीत

नांदेड – प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने घेतलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचं नवं रुप पाहायला मिळालं. रितेशच्या अनेक प्रश्नांना अशोक चव्हाण यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली.

विशेष म्हणजे मुलाखतीच्या शेवटी त्यांनी आपण चांगले बाथरुम सिंगर होतो असं म्हणत गाणीही म्हटली. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच अशोक चव्हाणांनी ‘मेरे सपनो की राणी कब आयेगी तू’ हे गाणं गायलं. यावर उपस्थित तरुणांनी जोरदार प्रतिसाद दिला. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी निमित्ताने नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांची दीर्घ मुलाखत झाली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

अशोक चव्हाण यांनी आराधना सिनेमातील ‘मेरे सपनो की राणी कब आयेगी कब’ हे गाणं गायलं. त्यानंतर ‘जिंदगी कैसे हैं पहिली’ हेही गाणं गायलं. अशोक चव्हाण यांच्यानंतर स्वतः रितेश देशमुखने देखील गाणी गायली. रितेशने आपल्या पहिल्या हिंदी चित्रपटातील ‘पल पल सोच में, तुझे मेरी कसम’ हे गाणं गायलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button