breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

ईशांतला डाव्या टाचेत त्रास ; उमेश यादवला मिळू शकते संधी

क्राइस्टचर्च | वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा दुसऱ्या कसोटीतून बाहेर होऊ शकतो. त्याच्या डाव्या टाचेत पुन्हा त्रास सुरू झाला. तो शुक्रवारी सराव सत्रात उतरला नाही. अशात त्याच्या जागी उमेश यादवला संधी मिळू शकते.

२० जानेवारीला रणजी ट्रॉफी सामन्यात इशांत जखमी झाला. तो कमीत कमी सहा आठवडे बाहेर राहू शकतो. मात्र, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) फिजिओ आशिष कौशिकच्या मार्गदर्शनाखाली इशांत केवळ चार आठवड्यांत तंदुरुस्त होईल. १५ फेब्रुवारीला कसोटी मालिकेसाठी तंदुरुस्त म्हणून जाहीर केले होते. त्यानंतर त्याने नेटमध्ये एक तासापेक्षा अधिक गोलंदाजी देखील केली. ईशांत न खेळल्यास संघासाठी मोठा धक्का असेल.

पहिल्या कसोटीत इशांतने न्यूझीलंडच्या फलंदाजांना अडचणीत आणले होते आणि पाच बळी घेतले. प्रशिक्षक रवी शास्त्रीने म्हटले की, पृथ्वी शॉ दुसऱ्या कसोटीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. अापल्याला एका पराभवामुळे चिंता करण्याची गरज नाही. मी वनडे आणि कसोटीची तुलना सोबत करू शकत नाही. दोन्ही वेगळे प्रकार आहेत. आमच्यासाठी आता वनडे आवश्यक नाही, कारण दोन वर्षांपर्यंत जागतिक कसोटी चॅम्पियनशिप चालेल. या वर्षाच्या अखेरीस टी-२० विश्वचषक होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button