breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मेट्रो ३ च्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांची प्रधान सचिवपदी बढती

मेट्रो ३ च्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांची सचिवपदी बढती देण्यात आली आहे. यासोबतच त्या मेट्रो ३ च्या व्यवस्थापकीय संचालिका म्हणूनही कार्यभार पाहणार आहेत. बुधवारपासून त्या प्रधान सचिवपदाची सूत्र हाती घेणार आहेत.

अश्विनी भिडे यांना प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली असून त्या बुधवारी आपल्या नव्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. अश्विनी भिडे यांच्या कामाचा आलेख पाहिला तर आधी एमएमआरडीए आणि आता एमएमआरसी मधल्या जबाबदाऱ्या ठळकपणे उठून दिसतात.

प्रशिक्षणानंतर अश्विनी भिडे यांचं पहिलं पोस्टिंग इचलकरंजी येथे करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी त्यांनी साहाय्यक जिल्हाधिकाऱ्याची जबाबदारी पार पाडली. तिथं कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न उपस्थित झाले होते. पण त्यांनी ते कौशल्यानं हाताळले. विभागीय आयुक्त अरूण भाटीया यांनीदेखील त्यांच्या कामाचं कौतुक केलं होतं. नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी असताना त्यांनी विकासकामांवर भर दिला. कमी खर्चात सूक्ष्म जलसिंचन करणारे रानजाई पद्धतीचे बंधारे उभारण्यावर त्यांनी भर दिला. त्याला चांगलं यशदेखील मिळालं होतं. खात्यामध्ये गैरप्रकार करणाऱ्या इंजिनीयरवरही त्यांनी कारवाई केली होती. २०१४-१५ या एका वर्षांत शिक्षण खात्याच्या सचिव पदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती.

मेट्रोची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेडमुळे त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. सरकार बदलल्यानंतर त्यांची बदली होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.मात्र राज्य सरकारनं त्यांना आता प्रधान सचिवपदी बढती दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button