breaking-newsराष्ट्रिय

नागा बंडखोरांच्या घातपाती हल्ल्यात दोन जवान शहीद

नागालॅंड : नागालॅंडमधील मोन जिल्ह्यात नागा बंडखोरांच्या घातपाती हल्ल्यात आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद झाले आहेत. तर आणखी चार जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या जवानांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मोन जिल्ह्यातील अबोई कस्बेजवळ नागा बंडखोरांनी हा घातपाती हल्ला केला. रविवारी संध्याकाळी तीन वाजताच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. येथील बीआरओ कॅम्पजवळ NSCN-K च्या बंडखोर आणि जवान यांच्यात काही तास चकमक सुरु होती.

आसाम रायफल्सच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात हवालदार फतेह सिंह नेगी आणि शिपाई एच कोनयाक शहीद झाले आहेत. तर, आणखी चार जवान जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  तसेच,  येथील स्थानिक लोकांनी सांगितले की, बंडखोर आणि जवान यांच्यात चकमक सुरु असताना गोळीबार आणि बॉम्बचा जवळपास एक तास मोठा आवाज येत होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button