breaking-newsपिंपरी / चिंचवड

पालिका आयुक्तांनी औद्योगिक विभागाला खासगी लॅबकडून टेस्ट करून घेण्याचे पाठविलेले पत्र मागे घ्यावे

  • माजी खासदार गजानन बाबर यांची मागणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पिंपरी-चिंचवड हद्दीतील सर्वांच्या टेस्ट मोफत करण्याचे जाहीर केले असल्याने औद्योगिक विभागाला खाजगी लॅब कडून टेस्ट करून घेण्याचे पत्र काढण्याचे कारण काय ?, असा सवाल माजी खासदार गजानन बाबर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केला आहे.

कोरोना महामारीच्या परिस्थितीला संपूर्ण देश सामोरे जात आहे. याला कोणीही अपवाद नाही, अशा परिस्थितीत केंद्र सरकार व राज्य सरकार विविध उपाययोजना राबवून नागरिकांना कसा काय फायदा होईल व नागरिकांना कशाप्रकारे सुविधा पुरवता येतील, तसेच प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येतील, यासाठी प्रयत्नशील आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील नागरिकांची लोकसंख्या 25 लाखांच्या घरात आहे. या पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सर्व स्तरातील विभागांचा उदाहरणार्थ औद्योगिक विभाग, आयटी सेक्टर, स्लम एरिया, प्राधिकरण एमआयडीसी रहिवाशी क्षेत्र अशाप्रकारे सामावेश होतो. तसेच पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेला सर्वाधिक फायदा कराद्वारे औद्योगिक व रहिवाशी विभागांकडून होतो. त्याद्वारे पिंपरी-चिंचवड शहराची डेव्हलपमेंट केली जाते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने 24 जून 2020 रोजी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व नागरिकांची कोरोना स्वॅप टेस्ट करून घ्यायचा ठराव मंजूर झाला आहे. परंतु असे असताना औद्योगिक विभागाला स्वतंत्रपणे टेस्ट करून घ्या, असे पत्राद्वारे कळवणे हे निर्णयाच्या विरोधात जाते. असे पत्र औद्योगिक विभागाला काढणे चुकीचे आहे. औद्योगिक विभाग महापालिकेच्या हद्दीत येतो.

महापालिका सरसकट कोरोना स्वॅप टेस्ट करून घेणार असेल तर असे परत पत्र काढणे चुकीचे ठरते. तरी आपण याच्यावर योग्य तो विचार करून औद्योगिक विभागाला खाजगी लॅब कडून टेस्ट करण्यास मनाई करावी, अशी मागणी बाबर यांनी आयुक्तांकडे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button