breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मेट्रोच्या नावात पिंपरी-चिंचवडचा समावेश तर पिंपरी स्टेशनच्या नावातही बदल

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पुणे महामेट्रोच्या नामकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेला वाद टोकाला जाण्याची अगोदरच पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधा-यांनी सावध भूमिका घेऊन पिंपरी मेट्रो स्टेशनच्या नावात बदल केला. पुणे महामेट्रोच्या नावात ”पिंपरी-चिंचवड, पुणे महामेट्रो” तर पिंपरीतील मेट्रो स्टेशनच्या नावात ”पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, पीसीएमसी पिंपरी मेट्रो स्टेशन” असा बदल केला आहे. या नामकरणाच्या प्रस्तावाला स्थायीच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

सभापती विलास मडिगेरी यांच्या अध्यक्षतेखाली स्थायीची सभा आज पार पडली. पिंपरी ते स्वारगेट मेट्रोचे काम सुरू आहे. मात्र, पुणे महामेट्रो या नावावर पिंपरीतील सत्ताधारी, विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. पिंपरी-चिंचवडचा नावलौकीक जगभरात असताना मेट्रोच्या नावात पिंपरीचा साधा उल्लेखही नसल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला होता. त्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांनी देखील नावात पिंपरीचा समावेश करण्याची मागणी केली. दोन दिवसांपूर्वी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी देखील मेट्रोच्या नावात पिंपरी-चिंचवडचा समावेश असणे अपेक्षीत असल्याचे पत्र आयुक्तांना, मेट्रो व्यवस्थापनाला दिले.

त्यावर आज झालेल्या स्थायी समिती सभेत मेट्रोच्या नावात बदल करण्याचा ठराव पास करण्यात आला. पुणे मेट्रोच्या नावात ”पिंपरी-चिंचवड, पुणे महामेट्रो” असे नामकरण करण्यात आले. तर, पिंपरी मेट्रे स्टेशनला ”पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, पीसीएमसी पिंपरी मेट्रो स्टेशन” असे नामकरण करण्यात आले. याबाबतच्या ठरावाला सभापती मडिगेरी यांनी मान्यता दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button