breaking-newsआंतरराष्टीय

मृतदेहाचा फोटो पाहून संपूर्ण जग हळहळलं

सेल्व्हाडोर येथील एका नागरिकाचा आणि त्याच्या दोन वर्षांच्या मुलीच्या एक फोटो सध्या व्हायरल होत असून नेटकरी आणि जगाला हादरवलं आहे. एकमेकांच्या मिठीत मृत्यूमुखी पडलेल्या बाप आणि मुलीचा हा फोटो पाहून अनेकजण भावुक झाले असून हळहळ व्यक्त केली जात आहे. यामुळे पुन्हा एकदा निर्वासितांचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. बाप आणि मुलगी मेक्सिकोमधील रियो ग्रेनेड नदी ओलांडून अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. पण यावेळी पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर जगभरातून संताप व्यक्त होत आहे. तसंच निर्वासित कशाप्रकारे आपला जीव धोक्यात घालत आहेत हेदेखील प्रकर्षाने समोर आलं आहे.

२५ वर्षीय ऑस्कर मार्टिन्स आपल्या २१ वर्षीय पत्नी आणि मुलगी व्हॅलेरिया मार्टिन्स यांच्यासोबत सेल्व्हाडोर येथून निघाले होते. जोखीम पत्करत ते मेक्सिकोमधून अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न करत होते. ऑस्कर यांनी आपल्या मुलीला पाठीवर घेतलं होतं. मुलगी सुरक्षित रहावी यासाठी त्यांनी तिला आपल्या टी-शर्टच्या आतमध्ये ठेवलं होतं. पण पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने ऑस्कर आणि त्यांची मुलगी पाण्यात बुडाले. यावेळी त्यांची पत्नी मात्र वाचली आणि सुखरुप नदी किनारी पोहोचली.

मेक्सिकोच्या तमौलिपस राज्यातील मटामोरोसमधील नदीच्या किनारी बाप लेकीचा मृतदेह सापडला. फोटोत ऑस्कर आणि त्यांच्या मुलीचा मृतदेह पाण्यात पडलेला दिसत आहे. यावेळी मृत्यूनंतरही दोघे एकमेकांच्या मिठीत असल्याचं दिसत आहे. या घटनेमुळे सेल्व्हाडोर आणि मेक्स्किोत प्रचंड संताप आहे. निर्वासितांसंबंधी असलेल्या चुकीच्या धोरणांमुळे सरकावर टीका होत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया
या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही प्रचंड टीका होत आहे. दरम्यान त्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत असे फोटो पाहणं आपल्यालाही आवडत नसल्याचं म्हटलं आहे. कदाचित फोटोत मृत पडलेली व्यक्ती एक सर्वोत्तम व्यक्ती असावी असंही ते म्हणाले आहेत. ट्रम्प यांनी अशा घटनांसाठी सीमारेषा धोरणं जबाबदार असल्याचं सांगितलं आहे.

‘त्या’ घटनेची आठवण
या फोटोमुळे सर्वांना एलेन कुर्दी या चिमुरड्याची आठवण झाली. एलेन कुर्दी हा सीरियातील निर्वासित मुलगा २०१५ मध्ये समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळून आला होता. वाळूवर निपचित पडलेल्या या निरागस मुलाचा मृतदेह पाहून जगभरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button