breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड मनपा कर्मचारी महासंघाच्या बोगस कामकाजाबाबत राज्याच्या कामगार आयुक्तांना नोटीस

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका कामगार महासंघाची निवडणूक ११ जानेवारी रोजी जाहीर झाली आहे. नवीन सभासद नोंदणीचा अभाव, निवडणूक कार्यक्रम जाहीर करुन हरकती व सूचना न मागविणे या मुद्दयांवर हरकत घेण्यात आली आहे. यासंदर्भात राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाने राज्याच्या मुख्य कामगार आयुक्तांना नोटीस बजावली आहे. तीन दिवसांच्या कालावधीत या तक्रारींची चौकशी करुन ’अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट’ सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाची विद्यमान कार्यकारणी बरखास्त करुन उपनिबंधकांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश औद्योगिक न्यायालयाने नुकताच दिला आहे. तसेच कर्मचारी संघटनेचा संपुर्ण ताबा आणि सर्व आर्थिक व्यवहार ताब्यात घेऊन प्रशासकांनी पुढील तीन महिन्यांत सभासदांची यादी तयार करावी, कार्यकारिणी निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा असा आदेशही औद्योगिक न्यायालयाने दिला आहेत. या पाश्र्वभूमीवर सुमारे २० वर्षानंतर येत्या ११ जानेवारी रोजी नवीन पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक प्रक्रीया होत आहे.

सुमारे १ हजार ७४३ कामगारांनी निवडणूक प्रक्रियेवर तीव्र हरकत नोंदविली आहे. तसेच, याबाबतची लेखी तक्रार अ‍ॅड. सागर चरण यांच्याकडे केली. याबाबत माहिती देताना अ‍ॅड. सागर चरण म्हणाले, निवडणूक जाहीर करण्यापुर्वी नवीन सभासद नोंदणी करुन सभासद यादी जाहीर करणे बंधनकारक आहे. तसेच, त्यावर हरकत व सुचना मागविणेही क्रमप्राप्त आहे. ११ जानेवारी रोजी दुसरा शनिवार असल्याने कामगारांना सुटी आहे. सुटीच्या दिवशी मतदान प्रक्रियेवरही कामगारांनी हरकत घेतली आहे.

या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाकडे धाव घेत तक्रार केली. त्याची दखल घेत राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाने राज्याच्या मुख्य कामगार आयुक्तांना आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना नोटीस बजावली आहे. कामगारांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन तीन दिवसात अहवाल सादर न केल्यास कारवाई करु, असा इशारा दिला आहे.        

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button