breaking-newsआंतरराष्टीय

माजी आयएसआय प्रमुखांना पाक लष्कराची नोटीस

  • भारतीय गुप्तचर प्रमुखांबरोबर प्रकाशित केले पुस्तक 

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेचे प्रमुख असद दुर्रानी यांनी भारतीय गुप्तचर संघटनेचे माजी प्रमुख एएस दुलत यांच्या बरोबर एक पुस्तक संयुक्तपणे लिहीले आहे. या बद्दल पाकिस्तानी लष्कराने असद दुर्रानी यांना एक नोटीस पाठवून याविषयीचा खुलासा करण्यास सांगितले आहे. त्यांनी विदेशातील माजी गुप्तचर प्रमुखांशी संगनमत करून संयुक्तपणे असे पुस्तक प्रकाशित करणे हा लष्करी आचार संहितेचा भंग आहे असे पाक लष्कराने म्हटले आहे.

लेफ्टनंट जनरल पदावर काम केलेले दुर्रानी हे ऑगस्ट 1990 ते मार्च 1992 या काळात आयएसआय या पाक गुप्तचर संघटनेचे प्रमुख होते. त्यांनी भारतीय माजी गुप्तचर प्रमुख दुलत यांच्या बरोबर द स्पाय क्रॉनिकल्स-रॉ, आयएसआय ऍन्ड इल्युजन ऑफ पीस नावाचे पुस्तक लिहीले आहे.

गेल्या बुधवारीच हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या प्रकरणात दुर्रानी यांना लष्करी मुख्यालयात पाचारण करण्यात आले असून त्यांना 20 मे रोजी तेथे उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.या पुस्तकातील तपशीलबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेच्या संबंधात एक उच्चस्तरीय बैठक त्वरीत बोलावण्यात यावी अशी मागणी माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केली आहे. पाकिस्तान सीनेटचे माजी प्रमुख रझा रब्बानी यांनीही या पुस्तकाबद्दल दुर्रानी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. शत्रु राष्ट्राच्या गुप्तचर प्रमुखांबरोबर त्यांनी असे पुस्तक लिहीणे सर्वत: गैर आहे असे त्यांनी म्हटले आहे. एखाद्या राजकीय नेत्याने असे पुस्तक लिहीले असते तर त्याला देशद्रोही ठरवले गेले असते असे ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button