breaking-newsराष्ट्रिय

के.जी.बोपय्यांच्या निवडीवरून काँग्रेसची पुन्हा न्यायालयात धाव

बंगळुरू : कर्नाटकातील रणसंग्रामात काँग्रेस – भाजपमध्ये  चांगलीच स्पर्धा निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने  कर्नाटकात बी एस येडियुरप्पा यांना उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहे. अशा वेळी नव्या विधानसभा संचालनासाठी राज्यपाल वजुभाई वाला यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून भाजप आमदार के.जी.बोपय्या यांची निवड केली. राज्यपालांनी घाईघाईतच त्यांचा शपथग्रहण सोहळाही उरकून घेतला. परंतु, काँग्रेसला मात्र हा निर्णय रुचलेला नाही. काँग्रेसनं या प्रकरणात पुन्हा एका सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

काँग्रेस नेते रजिस्ट्री ऑफिसमध्ये आपली पिटिशन दाखल करण्यासाठी दाखल झालेत. सध्या, न्यायाधीश शहराबाहेर असल्यानं मुख्य न्यायाधीश आता वेगळ्या बेन्चचं गठन करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कर्नाटकात भाजप आमदार के.जी.बोपय्या यांच्या नावाची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. उद्या फ्लोअर टेस्टही बोपय्याचे  घेणार आहे. यासाठी राज्यपाल वजुभाई वाला यांनी शुक्रवारी बोपय्या यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली. बोपय्या गेल्या वेळी भाजप सरकारमध्ये कर्नाटक विधानसभा अध्यक्ष होते. सध्या ते विराजपेठ मतदार संघातून भाजपचे आमदार आहेत. परंतु, के. जी. बोपय्या यांच्या निवडीला काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button