breaking-newsपुणे

पुण्यात महापौरांपाठोपाठ सहा नगरसेवकांना कोरोनाची लागण

पुणे : पुण्यात महापौरांपाठोपाठ आता महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यासह सहा नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय पुण्यातील दोन खासदार, चार आमदार हे होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यामुळे शहर आणि परिसरातील राजकीय क्षेत्र धास्तावले आहे. तसेच पालिकेच्या तब्बल 200 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

पुणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याने पालिका कर्मचारी आणि नगरसेवकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

नुकतोच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता सहा नगरसेवक यांना कोरोना झाल्याने अनेक लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रम कमी केले आहेत. त्यासोबत काहींनी तर घराबाहेर पडणेच बंद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button