breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशातील बँकांचे व्यवहार सलग 3 दिवस कोलमडण्याची चिन्हे…

 देशातील बँकांचे व्यवहार 3 दिवस कोलमडण्याची चिन्हे आहेत …कारण सर्व सरकारी बँका आज म्हणजे 31 जानेवारी आणि उद्या 1 जानेवारी संपावर आहेत… वेतन सुधारणेच्या प्रलंबित मागणीवर कोणतीही सहमती झाली नाही. त्यामुळे संपाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आज आणि उद्या सरकारी बँका बंद राहणार आहेत. याशिवाय संपाला जोडून रविवारची सुटी असल्यानं सलग तीन दिवस बँकांचे व्यवहार कोलमडण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे उद्या केंद्रीय अर्थसंकल्प असताना सर्व सरकारी बँका संपावर असतील. बँक संघटनांनी 20 टक्के वेतनवाढीची मागणी केली आहे.

भारतीय स्टेट बँकेसह इतर काही बँकांनी याबाबत माहिती दिली आहे. सलग दोन दिवस चालणाऱ्या या संपामुळे कामकाजावरही परिणाम झाल्याचे दिसून येणार आहे. तसेच एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होणार असून नेमका त्याच दिवशी सर्व सरकारी बँका संपावर असणार आहेत.

वेतन सुधारणेच्या प्रलंबित मागणीबाबत भारतीय बँक महासंघ अर्थातच आयबीए या बँक व्यवस्थापनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळाशी चर्चेत कोणत्याही मागणीवर सहमती न झाल्याने बँक कर्मचाऱ्यांनी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, बँक कर्मचारी शुक्रवारपासून देशव्यापी संपावर गेले आहेत. त्यामुळे शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस बँकाचे व्यवहार विस्कळीत होण्याची चिन्ह दिसून येत आहेत. दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील कर्मचाऱ्यांची वेतन सुधारणा नोव्हेंबर 2017 पासून प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ दोन दिवस संप होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button