breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

मुक्ताच्या घरात सापडला आईने जपून ठेवलेला खजिना…तिने स्वत:हा दिली कबुली…

मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्या घरात खूप मोठ्ठा खजिना सापडला आहे आणि ही माहिती तिने खुद्द दिली आहे. याबाबत तिने फोटोही शेअर केलेतं…

मुक्ताने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे आणि म्हटलं की, आज घरात एक खूप मोठ्ठा खजिना सापडला. माझ्या आईने लिहिलेली नाटकं. माझी आई पूर्वी शिक्षिका होती. शाळेतल्या मुलांसाठी तिने भरपूर नाटकं लिहिली, बसवली, पारितोषिकं मिळवली. लहान मुलांना आवडतील ,कळतील अश्या भाषेत तिने इतक्या विविध विषयांवर ही नाटकं लिहिली आहेत, मी आजही वाचताना रमून गेले. काय मज्जा ! आईमुळेच आणि तिने लिहिलेल्या नाटकातचं मी पहिल्यांदा स्टेज वर उभी राहिले होते.

मुक्ताने रंगभूमीवरून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ‘आम्हाला वेगळे व्हायचंय’ हे तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीचंच नाटक खूप गाजलं होतं. त्यानंतर ती घडतंय बिघडतंय, पिंपळपान, आभाळमाया, श्रीयुत गंगाधर टिपरे यांसारख्या मालिकांमध्ये झळकली. अग्निहोत्र ही तिची मालिका तर खूप गाजली होती. या मालिकेतील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे.

छोट्या पडद्यावर मिळालेल्या यशानंतर ती चित्रपटांकडे वळली. तिने थांग, देहभान यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतरचे मुंबई-पुणे-मुंबई ,जोगवा, डबल सीट, वेडिंगचा सिनेमा, स्माईल प्लीज यांसारखे तिचे चित्रपट प्रचंड गाजले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button