breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पुण्यात दोन ठाकरे एकमेकांविरोधात भिडणार !
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत वातावरण तयार करण्यासाठी शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची एकाच दिवशी पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी सभा होणार आहे.
शिवसेना प्रमुख यांची सभा 9 ऑक्टोबर रोजी होणार असून सभेचे नियोजन करण्यासाठी उद्या रविवारी (दि. 6) आकुर्डी येथील शिवसेनाभवनात होणार आहे. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पुण्यातील कोथरूड मतदार संघाच्या परिसरात होणार आहे.