breaking-newsराष्ट्रिय

गोठ्यात घुसलेल्या सिंहाला त्याने काठीच्या मदतीने हुसकावले

गुजरातमध्ये एका गावाच्या सरपंचाने सिंहाच्या तावडीतून एका गायीच्या वासराची सुटका केल्याची घटना समोर आली आहे. अमरेली जिल्ह्यामधील खंभाल तालुक्यामधील मोटा बारमन गावाचे सरपंच देवांशू वढेरा यांनी हा पराक्रमक केला आहे. विशेष म्हणजे केवळ एका काठीच्या मदतीने त्यांनी सिंहाला पळवून लावले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

मंगळवारी पहाटेच्या सुमारास देवांशू घराबाहेर पडल्याचे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते. गोठ्यामधून गायींच्या हंबरण्याचे आवाज येऊ लागल्याने मी काय झाले आहे हे पाहण्यासाठी घराबाहेर आल्याचे देवांशू यांनी सांगितले. या गोठ्याच्या मागे घराची सहा फूट उंच कुंपण असल्याने गोठ्यात नक्की कोण शिरले हे पाहण्यासाठी देवांशू आतमध्ये गेले. त्यावेळी त्यांना एक सिंह त्यांच्या गायींवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात आले. त्यांनी सिंहावर हल्ला करण्यासाठी लगेच बाजूला पडलेली लाकडाची काठी उचलली. सिंह एका वासराच्या मानेवर हल्ला करणार इतक्यात दिवांशू यांनी सिंहाला काठीने जोरदार दणका दिला.

‘काठीचा दणका बरोबर सिंहाच्या डोक्यावर बसल्याने घाबरलेला सिंहाने वासराचा नाद सोडला आणि तो संरक्षक भिंत ओलांडून पळून गेला,’ असं देवांशू यांनी सांगितले. तसेच प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन अनावधानाने आपल्या हातून ही कृती घडल्याचे ते म्हणाले. ‘सिंहाने ज्या वासराची मान पकडली होती ते अवघ्या पाच महिन्याचे आहे. ते मला खूप प्रिय आहे. सिंहाने त्याची मान पकडल्याचे पाहिल्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्याशिवाय माझ्याकडे अन्य पर्याय राहिला नाही आणि मी सिंहावर हल्ला केला,’ अशी माहिती देवांशू यांनी दिली. तसेच वासराऐवजी गायीवर हा हल्ला केला असता तर मी सिंहावर काठीला हल्ला केला नसता अशी कबुलीही देवांशू यांनी दिली.

Tv9 Gujarati

@tv9gujarati

: Man fights off lion to save cows

See Tv9 Gujarati’s other Tweets

(व्हिडिओ सौजन्य: टीव्ही 9 गुजराती)

‘गावाच्या आजूबाजूच्या जंगलांमध्ये चार सिंह राहत असून दोन एक दिवसांमधून एकदा ते आमच्या जनावरांवर हल्ला करतात. सिंहांची आता आम्हाला सवय झाली आहे’ असंही देवांशू यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button