breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई पोलिस दलातील 10 पोलिस उपायुक्तांच्या बदल्या तडकाफडकी रद्द…

मुंबई पोलिस दलातील १० पोलिस उपायुक्तांच्या बदल्या तडकाफडकी रद्द करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.मुंबई पोलिस दलातील १० पोलिस उपायुक्तांच्या तीन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या बदल्या गृह विभागाने रविवारी तडकाफडकी रद्द केल्या. बदल्यांतील निर्णयाच्या गोंधळामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

नवी मुंबई व ठाणे महापालिकेतील आयुक्तांच्या दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या बदल्यांमुळे प्रशासनातील वाद उघडकीस आला होता. त्यानंतर करोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई शहरात दोन किमी अंतरातच मुंबईकरांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करावी, असा आदेश काढून अनेक वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाई केली होती. ही कारवाई पोलिस आयुक्तांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सूचनेवरून केली होती. मात्र त्या निर्णयाची माहिती गृहमंत्र्यांना नव्हती.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आक्षेप घेतल्याचं समजतं. त्यानंतर गृहमंत्र्यांनी मुंबई पोलिस दलातील उपायुक्तांच्या बदल्या केल्या. बदली झालेल्या ठिकाणी तत्काळ पदभार स्वीकारा, असेही त्या आदेशात नमूद करण्यात आले होते. त्यानुसार बहुतांश अधिकाऱ्यांनी नवीन ठिकाणी जाऊन पदभार स्वीकारला व कामकाजास सुरुवातही केली. मात्र, लगेचच रविवारी बदली रद्द करण्यात आल्याचे आदेश गृह विभागाच्या वतीने जारी करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button