breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत महत्वाचा बदल

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनचा फटका जसा सामान्य लोकांना बसला तसा राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या काही योजनांनाही बसला आहे…तर त्यातल्या काही योजनांमध्ये बदलही करण्यात आला आहेे…त्यातली एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना

नागरिकांची लॉकडाउनमध्ये झालेली गैरसोय दूर करण्यासाठी सरकारने सुकन्या समृद्धी योजनेत महत्वाचा बदल केला आहे. त्यानुसार ‘लॉकडाउन’ मध्ये २५ मार्च २०२० ते ३० जून २०२० या काळात वयाची १० वर्षे पूर्ण केलेल्या मुलींची ३१ जुलै २०२० पर्यंत सुकन्या समृद्धी योजनेत नवी खाते सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

तर हे सुकन्या समृद्धी योजना म्हणजे नक्की काय आणि ती कोणासाठी आहे ते पाहुया…

  • सध्याच्या बचत गुंतवणुकीमध्ये मुलींचं भवितव्य उज्वलतेकडं नेणारी ही एक उत्तम योजना आहे. मुलीच्या अठराव्या वर्षी या योजनेच्या खात्यातल्या उपलब्ध शिल्लकेच्या पन्नास टक्के रक्कम तिच्या शिक्षणासाठी काढता येते आणि बाकी रक्कम २१ वर्षांनंतर नक्कीच किंवा लग्नाच्या वेळेस म्हणजे १८ ते २१ वर्षांदरम्यान कधीही काढता येते.
    या योजनेत व्याजदर किती आहे ?
  • केंद्र सरकारच्या इतर अल्पबचत गुंतवणुकीच्या व्याजदरांप्रमाणे सुकन्या समृद्धी योजनेचा दर तीन महिन्यांनी व्याजदर जाहीर केला जातो. सध्या या योजनेवर ७.६ टक्के व्याज आहे.
    गुंतवणूक कर वजावटीस पात्र आहे का ?
  • होय. सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूकदाराला करलाभ मिळतात. ज्या आर्थिक वर्षात या खात्यात पैसे भरले जातील तेवढे पैसे किंवा १,५०,००० यात कमी असलेली रक्कम त्या आर्थिक वर्षातल्या उत्पन्नातून आयकर ‘कलम ८० सी’अंतर्गत कर वजावटीस पात्र आहे.
    या योजनेचे खाते कुठे सुरु करता येईल?
  • सुकन्या समृद्धी योजनेत नवीन खातं सुरु करण्याची सुविधा टपाल कार्यालयात तसेच सार्वजनिक आणि खासगी बँकांमध्ये उपलब्ध आहे. मात्र, मुलीच्या दहाव्या वर्षांपर्यंतच फक्त दोन मुलींसाठीच या योजनेत खाते उघडता येतं.
    किती गुंतवणूक करू शकतो ?
  • सुकन्या समृद्धी योजने योजनेत किमान २५० रुपये तर कमाल १.५ लाख इतकी रक्कम प्रत्येक महिन्याला जमा करू शकता. गुंतवणुकीला आयकरातून सूट आहे. त्याशिवाय व्याज काढून घेतल्यास आणि अंतिम रक्कम जेव्हा हातात येते त्यावर कोणताही कर आकारला जात नाही.
  • गुंतवणुकीचा कालावधी किती ?
    -या योजनेनुसार पालक आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करू शकतात. मुलगी २१ वर्षाची होईपर्यंत परतावा म्हणून मोठी रक्कम मिळू शकते. सध्याच्या नियमानुसार जर मुलगी लहान असताना यात गुंतवणूक करण्यास सुरूवात केल्यास तर १५ वर्ष गुंतवणूक करता येते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button