breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कारने घेतला पेट; आपत्कालीन मदतीमुळे जीवित हानी टळली

मुंबई |महाईन्यूज|

मुबंई पुणे एक्स्प्रेसवेवर किमी 28 जवळ एका कारने अचानक पेट घेतल्याने खाक झाली. घटनेच्या ठिकाणी तात्काळ आपत्कालीन टीम दाखल झाल्याने जीवित हानी टळली.

मुबंई-पुणे एक्स्प्रेस वेवरून कार मुबंई हुन पुण्याकडे जात होती. ही कार खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत किमी 28 वर धामणी गावाजवळ आली असता तिने अचानक पेट घेतला होता. आग एवढ्या मोठ्या प्रमाणात लागली होती की काही वेळातच कार संपूर्ण जळून खाक झाली. तात्काळ आपत्कालीन टीम त्याठिकाणी दाखल होऊन आग विझवल्याने जीवित हानी टळली आहे. कारमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. वाहतूक सुरळीत असून खालापूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाल्याचे समजते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button