breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

एकूण ७८ सदस्यांपैकी विधान परिषदेतील राष्ट्रवादीच्या सर्वाधिक १० आमदारांची लवकरच निवृत्ती

महाईन्यूज | मुंबई

  • नवीन वर्षांत २६ सदस्यांची मुदत समाप्ती

नवीन वर्षांत विधान परिषदेचे २६ आमदार निवृत्त होत असून, सर्वाधिक १० आमदार राष्ट्रवादीचे आहेत. निवडणुका पार पडल्यावर वरिष्ठ सभागृहात सत्ताधारी महाआघाडीचे वर्चस्व राहणार असल्याने विधेयके मंजूर होण्यात सत्ताधाऱ्यांना अडचण येणार नाही. बहुधा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधिमंडळ सदस्य होण्यासाठी विधान परिषदेचा मार्ग पत्करतील, अशीच चिन्हे आहेत. विधान परिषदेतील एकूण ७८ सदस्यांपैकी एकतृतीयांश म्हणजे २६ सदस्य या वर्षांत निवृत्त होतील. यापैकी १२ सदस्य हे राज्यपाल नियुक्त होणारे सदस्य आहेत.

यामध्ये निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये सर्वाधिक १० आमदार हे राष्ट्रवादीचे आहेत. काँग्रेस (७), भाजप (५), शिवसेना (१), पीपल्स रिपब्लिकन (१) तर अपक्ष दोन आमदार निवृत्त होतील. सध्या विधान परिषदेत भाजपचे सर्वाधिक २२ आमदार आहेत. शिवसेना (१२), राष्ट्रवादी (१४) तर काँग्रेसचे १३ आमदार आहेत. एकतृतीयांश सदस्य निवृत्त झाल्यावर वरिष्ठ सभागृहातील पक्षीय संख्याबळ बदलेल. मात्र सध्याच्या विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस महाआघाडीचे बहुमत होईल.राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांमध्ये सध्या राष्ट्रवादीचे सहा, काँग्रेसचे पाच तर पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा एक आमदार आहे. एकूण जागांपैकी प्रत्येकी चार जागा शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस वाटून घेतील अथवा शिवसेना व राष्ट्रवादी जास्त जागा पदरात पाडून घेण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button