breaking-newsपिंपरी / चिंचवड

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये धारावी पॅटर्न राबवा

  • नगरसेवक उत्तम केंदळे यांची आयुक्तांकडे मागणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. आता पिंपरी चिंचवड पालिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धारावी पॅटर्न राबवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घ्यावा, अशी मागणी नगरसेवक उत्तम केंदळे यांनी केली आहे.

कोरोनाच्या रुग्णांना लवकर शोधून काढण्यासाठी या भागात नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेऊन सारो टेस्ट करण्यात येत होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जवळ जवळ ८०० स्वयंसेवक यांच्या मदतीने सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी व संबंधित कर्मचारी यांनी कोरोना आटोक्यात आणला.
धारावी पॅटर्नच्या धर्तीवर येथील नागरिकांच्या घरोघरी जाऊन स्क्रिनिंग करणे, मोबाईल स्क्रिनिंग करणे, लक्षणे आढळल्यास कोरोना चाचणी करणे, कंटेनमेंट झोनमध्ये पोलिसांच्या मदतीने प्रभावीपणे लॉकडाऊन करणे, क्वारंटाईन सेंटरची अंमलबजावणी करणे, जर इमारतीत कोरोना रुग्ण आढळला तर संपूर्ण इमारत सील करणे हे होत होते.

सुरूवातीपासून उपाययोजनांवर भर दिला होता. दाटीवाटीची झोपडपट्टी असल्याने येथे सुरक्षित वावर (फिजिकल डिस्टन्सिंग) किती अशक्य आहे, याची जाणीव होती. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांची तपासणी करून संशयितांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात पाठवण्यात आले. तसेच पॉझिटिव्ह रूग्णांची रूग्णालयात व्यवस्था करण्याची कार्यवाही करण्यात आली होती.

– तपासण्या, चाचण्या, उपाययोजना नेमके कसे काय केले?
– धारावीसारख्या अवाढव्य लोकसंख्येच्या परिसरात हे सर्व करताना अडचणी आल्या नाहीत?
– मोठ्या प्रमाणात विलगीकरण केल्यामुळे सार्वजनिक उपचार, स्वच्छता व अत्यावश्यक गरजांसाठी खूप प्रयत्न करावे लागेल असतील…

या सर्व बाबींचा विचार करून आपल्या शहरात स्वयंसेवक व प्रशासन एकत्र काम करून कोरोनामुक्त शहर याकडे वाटचाल करील म्हणून आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरात धारावी पॅटर्नची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केंदळे यांनी ई-मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button