breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

महायुती होवो अथवा न होवो, भाजपशी बेईमानी कदापी नाही, रासपची भूमिका स्पष्ट

  • कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री महादेव जानकर यांनी केली भूमिका स्पष्ट
  • भाजपसोबत काम करण्याचे कार्यकर्त्यांना दिले आदेश

पिंपरी, महाईन्यूज

भाजप-शिवसेना-रिपाई, रासप व इतर घटक पक्षांच्या महायुतीची अधिकृत घोषणा होत नसल्यामुळे यातील सर्वच पक्षांचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत. जरी युती तुटली तरी आपण भाजपसोबत कायम राहणार आहोत. युतीसोबत आपला नऊ जागांवर क्लेम आहे. युती तुटली तर राज्यातील जवळपास 22 जागा लढविण्याचे नियोजन आपण करणार आहोत, असे दुग्ध विकास आणि पशुपालन मंत्री तथा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पक्षाच्या मेळाव्यात सांगितले.

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील रासपच्या कार्यकर्त्यांना उर्जा देण्यासाठी मंत्री जानकर हे विविध शहरांमध्ये पक्षाच्या बैठका घेत आहेत. रहाटणी येथील बळीराज मंगल कार्यालयात रविवारी (दि. 29) राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या बैठकीत मंत्री जानकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुशील कुमार पाल, प्रसन्ना कुमार, बाळासाहेब दोडतले, मोहन माने, सरचिटणीस अण्णासाहेब रूपनवर, प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब केसकर, शहराध्यक्ष भरत महानवर, नितीन धायगुडे, प्रा. माणिकराव दांगडे, श्रद्धा भातांब्रेकर, सुरेश बंडगर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मेळाव्याचे नियोजन पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष भरत महानवर यांनी केले.

…तर रासप 22 जागा लढविणार

मंत्री जानकर म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत शिवसेना युतीतून बाहेर पडली, तर आपण शिवसेनेच्या उमेदवाराचे काम कदापी करणार नाही. निवडणुकीला सामोरे जात असताना भाजपसोबत आपली भूमिका कायम राहणार आहे. महायुतीसोबत आपण विधानसभेच्या 9 जागांची मागणी केली आहे. दौंड, अहमदपूर, गंगाखेड, माळशिरस, मान-खटाव यासह अन्य मतदार संघातून आपण लढणार आहोत. शिवसेना युतीतून बाहेर पडल्यास सुमारे 22 किंवा त्यापेक्षा अधिक जागा लढविण्याकडे आपला कल असेल. तरी, युतीच्या घोषणेची प्रतिक्षा न करता कार्यकर्त्यांनी भाजपसोबत एकजुटीने राहून काम करावे, असे आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button