breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई : तिनही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिनही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण डाऊन मंदगती मार्गावर स. ११ ते दु. ४ या वेळेमध्ये ब्लॉक असून यादरम्यान मुलुंडहून सुटणाऱ्या सर्व मंदगती आणि अर्ध जलद लोकल सकाळी १०.४७ ते दुपारी ३.५० पर्यंत मुलुंड आणि कल्याणपर्यंत जलद मार्गावर चालविण्यात येतील.

तर, पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. स. १०.३५ ते दु. ३.३५. या वेळेमध्ये ब्लॉक असून यादरम्यान सांताक्रुझ ते गोरेगाव जलद मार्गावरील लोकल गाडय़ा मंदगती मार्गावर चालवण्यात येतील. त्यामुळे लोकल उशिराने धावतील.

याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर स. ११.१० ते सायं ४.१० दरम्यान ब्लॉक असेल. यादरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा, वाशी, बेलापूर, पनवेल आणि वांद्रे, अंधेरी, गोरेगाव सेवाही बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय शनिवारी, १ सप्टेंबरलाही मध्यरात्री १.३० ते पहाटे ६.३० पर्यंत कुर्ला आणि विद्याविहार येथील पादचारीपुलाचा गर्डर उभारण्यासाठी ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक वडाळा ते मानखुर्द दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल, बेलापूर, वाशीपर्यंत पहाटे ४.३२ ते सकाळी ६.१६ पर्यंत आणि वाशी, बेलापूर, पनवेल ते सीएसएमटीपर्यंत पहाटे ३.५१ ते स. ६.१६ पर्यंत लोकल सेवा चालवण्यात येणार नाही. या कालावधीत पनवेल-मानखुर्द – पनवेल दरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील. प्रवाशांना ठाणे ते वाशी किंवा नेरुळ स्थानकावरून प्रवास करता येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button