breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

मुंबई-गोवा रेल्वेने प्रवास करणारे 7 जण COVID-19 पॉझिटिव्ह, गोव्यात रुग्णांची एकूण संख्या 29 वर

गोवा | राज्य हे ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र त्यांच्या आनंदावर विरजण पाडले ते मुंबईहून गोव्याला गेलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी. ही संख्या हळूहळू वाढत जाऊन आता 29 वर पोहोचली आहे. त्यात रविवारी मुंबई-गोवा रेल्वेने प्रवास करणा-या प्रवाशांमध्ये 7 कोरोना पॉझिटिव्ह आढळले. TrueNat टेस्टिंग मध्ये हे 7 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

यामुळे गोव्यात सध्या एकूण 29 रुग्ण उपचार घेत आहे. 1 मे ला गोवा ग्रीन म्हणून घोषित करण्यात आले होते. गोवा राज्यात कोणताही समुदाय नाही असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दावा केला होता. गोव्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा रेल्वे स्थानकात विशेष रेल्वेला थांबा देण्यात येऊ नये अशी मागणी केली होती. देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 90, 927 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 120 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. सद्य स्थितीत देशात 53,946 रुग्ण उपचार घेत असून 34,109 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर आतापर्यंत एकूण 2872 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ही संख्या पाहता सध्या भारतासाठी खूप अवघड परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button