breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नोटबंदीच्या निर्णयाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसने घातले श्राध्द

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षापूर्वी केलेली नोटबंदी हा एक मोठा घोटाळा असून त्यामुळे कित्येक निष्पाप लोकांना पैसे काढण्यासाठी एटीएम आणि बॅंकांच्या रागेंत उभे राहून होणा-या त्रासाला सामोरे जावे लागले. कित्येक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. नोटबंदीचा निषेध करत युवक राष्ट्रवादीच्या वतीने आज शुक्रवारी (दि. 8) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नोटबंदीच्या निर्णयाचे श्राध्द घालून अनोखे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचे प्रवक्ते फजल शेख, शहर युवकचे उपाध्यक्ष निखिल दळवी, प्रतिक साळुंखे, सचिन मोकाशी, शदाफ खान, मंगेश बजबळकर, अक्षय माचरे, दिनेश पटेल, किसन चावरिया आदी यावेळी उपस्थित होते.

फजल शेख म्हणाले की, नोटबंदीच्या निर्णयाला आज तीन वर्ष पूर्ण होत आहेत. हा निर्णय घेताना भाजपने विरोधी पक्षातील पदाधिका-यांना विश्वासात घेतले नाही. स्वतःला वाटले म्हणून हा निर्णय घेतला गेला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांना बँका आणि एटीएमच्या बाहेर रांगेत उभे राहूनही पैसे मिळत नसल्याची भीषण परिस्थिती होती. या जुलमी निर्णयाचा नागरिकांत सुध्दा रोष कायम आहे. त्याचे पडसाद म्हणून नागरिकांनी राज्यात भाजपला नाकारले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button