breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड मधील कामत हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम

पिंपरी | पिंपरी चिंचवड मधील कामत हॉस्पिटलने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणुन सॅनिटायजेशन टनेल हे डॉ. दिलीप कामत यांच्या मार्गदर्शनाखाली उभारले आहे. कामत हॉस्पिटल चा स्टाफ, पेशंट्स आणि चिंचवड पोलीस स्टेशन चे कर्मचारी यांच्यासाठी कामत हॉस्पिटल तर्फे ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

सध्याच्या अडचणीच्या काळामध्ये लॉक डाउन असुनही कर्मचारी यांना कामावर यावे लागत आहे.हे उभारण्यात आलेले टनेल हे कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त ठरेल अशी माहिती हॉस्पिटल चे CEO डॉ. अभिजित भोंडवे यांनी दिली.

या टनेल मधुन डोके ते पायापर्यंत एखाद्या व्यक्तीचे काही सेकंदामध्ये निर्जंतुकीकरण केले जाऊ शकते. छिद्र असणाऱ्या या स्प्रे द्वारे लोकांवर औषधाची फवारणी केली जाते. कर्मचारी यांना त्यातुन जाताना हात उंचावुन जाण्याचा सल्ला दिला आहे.हे टनेल उभे करण्यासाठी चिंचवड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र जाधव यांनी सहकार्य केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button