breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

अजित पवारांना कोरोनाची लागण नाही; पार्थ पवारांनी केले अफवांचे खंडन

पुणे |महाईन्यूज|

राज्याचे राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे पार्थ पवार यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवारांना गेल्या तीन-चार दिवसांपासून अंगदुखी, ताप येत आहे. यामुळे पवारांनी सर्व दौरे रद्द करून मुंबईतील घरीच विश्रांती घेतली आहे.

मात्र, अजित पवारांचे पूत्र पार्थ पवार यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. त्यांनी अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे एका वृत्तवाहिनीला सांगितले आहे.

अजित पवारांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे, सुदैवाने ही चाचणी निगेटिव्ह आली आहे. अजितदादांच्या कोरोना चाचणीबाबत विविध चर्चा सुरु होत्या. मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या अजित पवार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच थांबून विश्रांती घेत आहेत. शनिवारी अजित पवारांनी बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी केली होती. मात्र, बुधवारी त्यांनी दौरे रद्द केले होते. पुरामुळे बाधित रस्ते, पुलांच्या दुरुस्तीचं कामे करण्याच्या सूचना अजित पवारांनी प्रशासनाला दिल्या.

पंढरपूर येथील दौरा आटोपल्यानंतर अजित पवारांना कणकण जाणवू लागली. त्यानंतर त्यांना ताप आला. अजितदादांची कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल निगेटिव्ह आला, परंतु खबरदारी म्हणून अजित पवार घरीच विश्रांती घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button