breaking-newsमहाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर २०१७ पासून विविध अपघातांत ४८१ जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबई ते गोवा महामार्गावरील खड्डय़ांवरून राजकारण तापले असतानाच दुसरीकडे या मार्गावरील प्रवास जिवघेणाच ठरत आहे. २०१७ पासून झालेल्या विविध अपघातांत ४८१ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१७ पासून प्राणांतिक अपघात काही केल्या कमी होत नसून ते रोखणे प्रशासनासमोर आव्हान असणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे पडल्याने व पावसाळ्यात चिखल उडत असल्याने येथून प्रवास करणे कठीण झाले आहे.

या महामार्गावरील चौपदरीकरणाचे कामही अद्याप सुरू असून शासनाने डिसेंबर २०१९ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एकंदरीतच या मार्गाची दुरवस्था झाली असतानाच वाढत्या अपघातांच्या घटना हेदेखील चिंतेचे कारण ठरत आहे.  २०१७ ते २०१९ मेपर्यंत एकूण १ हजार ९८५ विविध अपघात झाले आहेत. यामध्ये ४०५ प्राणांतिक अपघात असून ४८१ जणांना प्राण गमवावे लागल्याची माहिती महामार्ग पोलिसांकडून प्राप्त झाली.

२०१७ मध्ये १५० प्राणांतिक अपघातांमध्ये १७२ जणांचा मृत्यू झाला असतानाच २०१८ मध्ये हाच अपघाताचा आकडा वाढला. १७२ अपघातांत २१९ जणांचा मृत्यू झाला. २०१९ मध्ये मे महिन्यापर्यंत ८३ अपघातांमध्ये ९० जण दगावल्याची नोंद झाली आहे. वेगाने व बेदरकारपणे वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, ओव्हरटेक इत्यादी कारणांमुळे अपघात होत असल्याचे सांगण्यात आले.

 

र्ष                                       गंभीर जखमी                  किरकोळ जखमी      

अपघात     जखमी              अपघात      जखमी

२०१७                                         २१५         ६२४                    १८७           ५४३

२०१८                                          १७२         ४८५                   २०६          ५२३

२०१९ (जानेवारी ते मे)                 ८३           २०४                    ९३            २३४

 

याव्यतिरिक्त ६२४ वाहन अपघातांत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button