breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

हिंमत असेल तर सरकार पाडाच” मुख्यमंत्र्यांचं भाजपला खुल आव्हान… मुलाखतीचा ट्रेलर प्रदर्शित…(VIDEO)

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह विरोधकांना हिंमत असेल तर माझी मुलाखत सुरु आहे, सरकार पाडून दाखवा, असं थेट आव्हान दिलेलं आहे. सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत  त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, “मी इथं बसलो आहे, हिंमत असेल तर मुलाखत सुरु असताना सरकार पाडा.” ही मुलाखत सामनाकडून शनिवारी (25 जुलै) आणि रविवारी (26 जुलै) प्रसारित केली जाणार आहे. त्यापूर्वी संजय राऊत यांनी या मुलाखतीचा ट्रेलर ट्विट केलेला आहे. यात मुख्यमंत्री आक्रमकपणे विरोधकांना सडेतोड उत्तरं देताना दिसत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सामनातील मुलाखतीची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील अनेकांना उत्सुकता लागलेली आहे. संजय राऊत यांनी मुलाखतीचा ट्रेलर टाकल्यानंतर या मुलाखतीची उत्सुकता आणखीच वाढल्याचं दिसत आहे. या ट्रेलरमध्ये संजय राऊत उद्धव ठाकरे यांना विरोधक महाविकासआघाडी सरकारला तीनचाकी सरकार, रिक्षा म्हणत असल्याचा मुद्दा उपस्थित करत आहेत. यावर उद्धव ठाकरे यांनी केंद्रात मोदी सरकारसोबत आलेल्या मित्रपक्षांच्या संख्येवर बोट ठेवत केंद्रात किती चाकी सरकार आहे? असा प्रतिप्रश्न विचारलेला आहे.

यावेळी त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावरही भाष्य केलं. आज तुम्हाला चीन नको आहे, मात्र पुढे जाऊन कालांतराने भारत-चिनी भाईभाई होणार नाही का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवरच निशाणा साधला आहे. मी वयाच्या साठाव्या वर्षी मुख्यमंत्री झालो असलो तरी “याच’साठी’ केला होता अट्टाहास” असं नाही. हा केवळ योगायोग आहे, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं आहे. तसेच काहीजण विरोधी पक्षनेतेपदही साजरं करत आहेत, असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावाल. या संपूर्ण मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्याकडून अनेक विषयांवर सडेतोड टोलेबाजी पाहायला मिळणार असल्याचं या ट्रेलर्सवरुन दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button