breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुंबईसह ठाण्यात पावसाची तुफान बॅटींग, समुद्राला भरती

मुंबई | महाईन्यूज

महिनाभर दडी मारून बसलेल्या पावसाने कालपासून पुन्हा बरसायला सुरुवात केली आहे. काल पावसाने मुंबईला आक्षरषः झोडपून काढले. रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील पावसाची बॅटींग सुरूच आहे. समुद्रातही मोठ्या लाटा उसळू लागल्या आहेत.

मुंबईत शनिवारी (दि. 4) पावसाची तुफान बरसात झाली. साडेआठ ते रात्री साडेआठपर्यंत सांताक्रूझमध्ये १३२.२ मिमी तर कुलाबा येथे ७४.६ मिमी पावसाची नोंद झाली. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज, रविवारी मुंबईत अधूनमधून मध्यम ते मुसळधार सरींचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र मुंबईसह अनेक भागात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे.

शनिवारी महापालिकेच्या नोंदीनुसार पश्चिम उपनगरांमध्ये शहर आणि पूर्व उपनगरांमध्ये अधिक पाऊस होता. शहरांमध्ये सायंकाळी ६ पर्यंत ८१.९१, पूर्व उपनगरांमध्ये ८२.६९ तर पश्चिम उपनगरांमध्ये ८८.६७ मिमी पावसाची नोंद झाली. पश्चिम उपनगरांमध्ये काही ठिकाणी शनिवारी सायं. ७.३०पर्यंतच्या २४ तासांमध्ये २०० मिमी अर्थात २० सेंटीमीटरहून अधिक पाऊस झाला.

मुंबईसह ठाणे-दिवा-डोंबिवली-कल्याण-भिवंडी परिसरात रात्रभर पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. उत्तर कोकणात रेड अलर्ट, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील काही भागांमध्ये रिमझिम पाऊस पडेल मराठवाड्यात आज पाऊस दडी मारणार असल्याचंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

राजधाणी दिल्लीतही वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसानं रात्रीपासून थैमान घातलं आहे. पुढचे 3 दिवस दिल्लीत पावसाचा जोर कायम राहिल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button